बुलेटच्या धडकेत चालकासह सायकलस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:55 AM2018-03-03T00:55:22+5:302018-03-03T00:55:22+5:30

भरधाव बुलेटस्वाराने रस्ता ओलांडत असलेल्या सायकलस्वारास दिलेल्या धडकेत बुलेटचालकाचा जागीच, तर सायकलस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सातपूर औद्योगिक वसाहतीतील इंडियन टूल कंपनीसमोरील चौकात घडली़ या अपघातात बुलेटस्वाराच्या पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Cylinder killed in a bullet shock | बुलेटच्या धडकेत चालकासह सायकलस्वार ठार

बुलेटच्या धडकेत चालकासह सायकलस्वार ठार

googlenewsNext

नाशिक : भरधाव बुलेटस्वाराने रस्ता ओलांडत असलेल्या सायकलस्वारास दिलेल्या धडकेत बुलेटचालकाचा जागीच, तर सायकलस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सातपूर औद्योगिक वसाहतीतील इंडियन टूल कंप-  समोरील चौकात घडली़ या अपघातात बुलेटस्वाराच्या पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास विठ्ठल महादू कडाळे हे नलिनी तांगडे (४०) यांच्यासोबत बुलेटने (एमएच १५ एफएल ३१३२) सातपूर औद्योगिक वसाहतीतील इंडियन टूल कंपनीसमोर असलेल्या चौकातून भरधाव जात होते. त्यांनी रस्ता ओलांडत असलेला सायकलस्वार मिथुन निचेडी चव्हाण (२०) यास जोरात धडक दिली़ यामध्ये बुलेटचालक विठ्ठल कडाळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला,तर नलिनी तांगडे यांच्या डोक्यास व हातापायास गंभीर दुखापत व सायकलस्वार मिथुन चव्हाण यांच्याही डोक्यास व कमरेला गंभीर दुखापत झाली होती़ पोलीस हवालदार रमेश दराडे यांनी या अपघाताबाबत सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़
सातपूर पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले़ त्यांनी तत्काळ या तिघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी बुलेटचालक विठ्ठल कडाळे यांना तपासून मयत घोषित केले़, तर सायकलस्वार मिथुन चव्हाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़

Web Title: Cylinder killed in a bullet shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात