बिल्डर्स-डेव्हलपर्सकडून महिलेला ३८ लाखांना गंडा पाच प्लॉट्स नावावर करून देण्याचे आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:14 AM2017-12-01T01:14:46+5:302017-12-01T01:14:52+5:30

त्र्यंबकेश्वर परिसरातील वाढोली गावाच्या शिवारातील पाच प्लॉट्स नावावर करून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला भामट्याने ३८ लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.

Builders-Developers lure the woman to donate 38 lacs to five plots | बिल्डर्स-डेव्हलपर्सकडून महिलेला ३८ लाखांना गंडा पाच प्लॉट्स नावावर करून देण्याचे आमिष

बिल्डर्स-डेव्हलपर्सकडून महिलेला ३८ लाखांना गंडा पाच प्लॉट्स नावावर करून देण्याचे आमिष

Next

इंदिरानगर : त्र्यंबकेश्वर परिसरातील वाढोली गावाच्या शिवारातील पाच प्लॉट्स नावावर करून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला भामट्याने ३८ लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
वाढोली येथील पाच प्लॉट्स विक्र ी करून नावावर करून देतो, असे सांगून अडोतीस लाख रु पये स्वीकारल्यानंतर हे प्लॉट्स दुसºया महिलेला विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीनाक्षी श्यामकांत गवांदे या मालेगावरोड येथील रहिवासी आहेत. त्यांनी महेंद्र रघुनाथ मेतकर यांच्या जय कन्स्ट्रक्शन बिल्डर्स व डेव्हलपर्स या रथचक्र चौकातील कार्यालयात येऊन त्र्यंबकेश्वर येथील वाढोली येथील प्लॉट क्रमांक १३ व त्या सभोवतालचे प्लॉट खरेदीची तयारी दर्शविली. त्यानुसार गवांदे व मेतकर यांच्यात व्यवहार ठरल्यानंतर गवांदे यांनी वेळोवेळी रोख व चेक स्वरूपात मेतकर यांना सुमारे अडोतीस लाख रु पये दिले. त्यानंतर हे प्लॉट नावावर करून देण्यासाठी मेतकर हे टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आले. त्याचबरोबर यातील एका प्लॉटची विक्रीसुद्धा त्यांनी केली असल्याचे लक्षात आले आल्याने गवांदे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी मेतकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत.

Web Title: Builders-Developers lure the woman to donate 38 lacs to five plots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.