भाजपा ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 01:02 AM2018-05-13T01:02:17+5:302018-05-13T01:02:17+5:30

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अधिकृत उमेदवार न देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ अशी भूमिका घेतल्यामुळे पक्षाच्या मतदारांबरोबरच जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी व शिवसेनादेखील संभ्रमात सापडली आहे.

BJP plays 'Wet and Watch' | भाजपा ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत

भाजपा ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत

Next

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अधिकृत उमेदवार न देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ अशी भूमिका घेतल्यामुळे पक्षाच्या मतदारांबरोबरच जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी व शिवसेनादेखील संभ्रमात सापडली आहे. अशा परिस्थितीत परवेज कोकणी यांनी शनिवारी राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची मुंबईत भेट घेतल्यामुळे शिवाजी सहाणे यांच्याही छातीचे ठोके वाढले आहेत. येत्या दोन दिवसात सारे चित्र स्पष्ट होईल असे संकेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याचे भाजपाच्या पदाधिकाºयांचे म्हणणे आहे.  तिरंगी लढतीमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत जोरदार चुरस निर्माण झाली असून, विशेष करून भारतीय जनता पार्टी काय भूमिका घेते यावर निवडणुकीच्या विजयाचे गणित मांडले जात आहे. ६४४ एकूण मतदार असलेल्या या मतदारसंघात सर्वाधिक संख्याबळ शिवसेनेकडे असून, त्यापाठोपाठ भाजपाची संख्या आहे. शिवसेनेने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली, भाजपाने उमेदवार दिला नसला तरी जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी यांना छुपी मदत चालविली आहे.  अशा परिस्थितीत भाजपाने आपली भूमिका स्पष्ट करावी असे शिवसेनेला वाटत असले तरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी याबाबतची संदिग्धता ठेवली असून, शुक्रवारी रात्री नाशिक भेटीवर आलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवस ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चा सल्ला दिल्याचे भाजपाच्या पदाधिकाºयांचे म्हणणे आहे. असे असले तरी कोकणी यांच्या प्रचारात भाजपाच्या पदाधिकाºयांचा मात्र सहभाग कायम आहे.  भाजपा भूमिका स्पष्ट करीत नसल्याने दराडे व कोकणी या दोघांनाही अंदाज बांधणे कठीण झाले आहे.
भाजपाच्या भूमिकेवर राष्टÑवादीचे शिवाजी सहाणे यांचेही बरेचसे गणित अवलंबून आहे. त्यामुळे दोन दिवसात वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घेतला जाईल याकडे साºयांचे लक्ष लागलेले असताना शनिवारी जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी यांनी मुंबईत जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेतली. कोकणी हे मूळ राष्टÑवादीचे असल्यामुळे त्यांचे भुजबळ यांच्याशी जुने सख्य आहे; परंतु ते आता विधान परिषदेचे उमेदवार असल्यामुळे त्यांनी भुजबळ यांची घेतलेली भेट सहाणे यांना काळजीत टाकणारी आहे. तथापि, सहाणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने रविवारी रात्री पक्षाचे नेते अजित पवार नाशिक दौºयावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत दोन्ही कॉँग्रेसची बैठक बोलविण्यात आली आहे.

Web Title: BJP plays 'Wet and Watch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.