घंटागाडीचा तंटा उद्या न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 01:03 AM2021-12-08T01:03:56+5:302021-12-08T01:04:22+5:30

महापालिकेच्या सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांच्या घंटागाडी ठेक्याच्या संदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर बुधवारी (दि.८) सुनावणी होणार आहे.

Bell train dispute in court tomorrow | घंटागाडीचा तंटा उद्या न्यायालयात

घंटागाडीचा तंटा उद्या न्यायालयात

googlenewsNext

नाशिक- महापालिकेच्या सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांच्या घंटागाडी ठेक्याच्या संदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर बुधवारी (दि.८) सुनावणी होणार आहे. मंगळवारी (दि.७) यावरील सुनावणी टळली हेाती. नाशिक महापालिकेने घंटागाडीसाठी निविदा मागवल्या असल्या तरी मुळात त्यासाठीचा परवाना १९८६ ला रद्द करण्यात आला आहे. त्यातच औद्याेगिक न्यायालयाच्या आदेशानुसार यापूर्वी काम करणाऱ्या घंटागाडी कामगारांना कामावरून कमी करण्यास नकार दिला आहे. मात्र महापालिकेने निविदा काढताना घंटागाड्यांबरोबरच कामगार पुरवण्याचे देखील प्रस्तावित केले आहे. श्रमिक संघाने यासंदर्भात उच्च न्यायालयात महापालिकेला आव्हान दिले असून त्यावर आता बुधवारी (दि.८) सुनावणी होणार आहे.

Web Title: Bell train dispute in court tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.