निराधार विधवा महिलांना शासकीय योजनेचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 05:19 PM2019-01-10T17:19:10+5:302019-01-10T17:19:53+5:30

इगतपुरी तालुक्यातील कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूने निराधार झालेल्या १८ विधवा महिलांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून अर्थसहाय्याचे वितरण येथे करण्यात आले.

The basis of government schemes for dependent widows | निराधार विधवा महिलांना शासकीय योजनेचा आधार

निराधार विधवा महिलांना शासकीय योजनेचा आधार

Next

विधवा निराधार असणाऱ्या मंजुळा भागडे ( तळोघ ), योगिता मुसळे ( नांदगांव बुद्रुक ), राहीबाई चवर ( तळेगांव बुद्रुक ), तान्हुबाई भांगरे ( पिंपळगांव घाडगा ), स्वाती कदम ( बोर्ली ), नंदिनी ताठे ( नागोसली ), तोलाबाई ठाकरे ( तारांगण पाडा ), अनिता म्हसणे ( फांगुळगव्हाण ), सुमन पवार ( बेलगांव कुर्हे ), शोभा दिवटे ( शेनवड बुद्रुक ), यशोदाबाई रेरे ( पिंपळगांव भटाटा ), मिराबाई सराई ( कुशेगांव ), राधिका वायळ ( शेनवड बुद्रुक ) सुमन आगिवले ( भावली खुर्द ), आशाबाई भागडे ( गिरणारे ), इगतपुरी येथील मीना घनघाव, प्रभाकर पवार, मीना जगताप यांना प्रत्येकी २० हजारांचा धनादेश आमदार निर्मला गावित यांच्या हस्ते देण्यात आला. या योजनेअंतर्गत ३ लाख ६० हजारांचे वितरण झाले. यावेळी इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे, इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कचरू पाटील डुकरे, कचरू शिंदे, पांडुरंग शिंदे, पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी, संजय गांधी योजनेचे संजय गांधी योजनेचे अधिकारी एस. डी. मंडलीक, जी. जी. महाजन, पी. आर. रोहेरा, एस. डी. बच्छाव आदी उपस्थित होते.

Web Title: The basis of government schemes for dependent widows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.