बालनाट्य स्पर्धेत बहरली ‘वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:57 AM2019-02-26T00:57:20+5:302019-02-26T00:57:47+5:30

महाराष्ट शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पहिल्या महाराष्टÑ राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धेत सात बालनाटिका सादर झाल्या.

Balaratta Tournament Bihlali 'Vanraii | बालनाट्य स्पर्धेत बहरली ‘वनराई

बालनाट्य स्पर्धेत बहरली ‘वनराई

Next

नाशिक : महाराष्ट शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पहिल्या महाराष्टÑ राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धेत सात बालनाटिका सादर झाल्या. येत्या २७ तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात नाशिककरांना बालकांच्या नाट्याविष्काराचा अनुभव घेता येणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी झालेल्या नाटिकांनी बालकांमधील चुणूक दाखविली. ‘वनराई’ आणि ‘मोल-अनमोल’ या नाटकांना रसिकांची दाद मिळाली. अन्य नाटकांनीदेखील लक्ष वेधून घेतले.
महाकवी कालिदास कलामंदिर येथे सुरू असलेल्या या महोत्सवात वनराई, मोल-अनमोल, गंगेची माया, छोट्यांनी जिंकले, झेप, बाहुली, किलबिल ही नाटके सादर झाली. मनीषा नलगे लिखित आणि तेजस बेल्दीकर यांनी दिग्दर्शन केलेले मोल-अनमोल या नाटकात बालकांनी आज-कालच्या मुलांचे सोशल मीडियामुळे झालेले नुकसान यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. मुले खेळ विसरत चालल्याचे वास्तव मांडण्यात आले. प्रबोधिनी विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी या नाटकाचे सादरीकरण केले.
प्रबोधिनी ट्रस्ट संचलित श्रीमती सुनंदा लेले विद्यामंदिर शाळेने सादर केलेले ‘वनराई’ या नाटकानेदेखील पर्यावरण संवर्धनाचा संदेश  दिला.

Web Title: Balaratta Tournament Bihlali 'Vanraii

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.