दुष्काळ अनुदानाची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 10:01 PM2020-03-05T22:01:36+5:302020-03-05T22:03:13+5:30

सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या लक्ष्मणपूर या गावातील शेतकरी अद्यापही सन २०१८-१९ वर्षाच्या दुष्काळी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत तहसीलदार, तलाठी यांच्याकडे वारंवार लेखी व तोंडी तक्र ार करूनदेखील यावर कुठलीही कारवाई झाली नसून महसूल विभागाच्या ढिसाळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचा आरोप सरपंच लता कारले, उपसरपंच भाऊसाहेब जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे.

Awaiting drought subsidy | दुष्काळ अनुदानाची प्रतीक्षाच

दुष्काळ अनुदानाची प्रतीक्षाच

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासनाचा सावळा गोंधळ : तहसीलदारांकडे तक्र ारी करूनही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या लक्ष्मणपूर या गावातील शेतकरी अद्यापही सन २०१८-१९ वर्षाच्या दुष्काळी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत तहसीलदार, तलाठी यांच्याकडे वारंवार लेखी व तोंडी तक्र ार करूनदेखील यावर कुठलीही कारवाई झाली नसून महसूल विभागाच्या ढिसाळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचा आरोप सरपंच लता कारले, उपसरपंच भाऊसाहेब जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे.
गतवर्षी राज्यभरात मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता. या दुष्काळाची सर्वात जास्त झळ सिन्नर तालुक्याला बसली. दरम्यान २०१८-१९ या आर्थिक वर्षातील दुष्काळी भागातील शेतºयांना दिलासा देण्यासाठी दुष्काळ जाहीर झालेल्या गावांतील शेतकºयांना खरीप आणि रब्बीसाठी हेक्टरी सात तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती. यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाकडे संबंधित गावांचा निधी दिला होता. निधी वाटप सुरू असताना लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही काळ निधीचे वाटप थांबविण्यात आले होते. निवडणुकीनंतर पुन्हा वाटप सुरू करण्यात आले.
मात्र, सर्वत्र शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा होत असताना तालु्क्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या लक्ष्मणपूरच्या शेतकºयांना अद्यापही दुष्काळी अनुदान प्राप्त झालेले नाही. याबाबत शेतकºयांच्या तक्रारी आल्यानंतर ग्रामंचायतीच्या वतीने तहसीलदार राहुल कोताडे यांना सबंधित निधी शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात यावा, अशा मागणीचे पत्र देण्यात आले होते. तसेच कामगार तलाठी यांच्याकडे सर्व खातेदार शेतकºयांची माहिती जमा करण्यात आली आहे, मात्र तरीदेखील संबंधित शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याचा आरोप सरपंच लता कारले, भाऊसाहेब जाधव यांनी केला आहे. महसूल विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका शेतकºयांना बसत असून, अनुदान खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अन्यथा सर्व शेतकरी मिळून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.वर्ष उलटूनदेखील लक्ष्मणपूरच्या शेतकºयांना सन २०१८-१९ वर्षाचे दुष्काळी अनुदान अद्याप मिळालेले नाही. याबाबत तहसीलदारांकडे विचारणा केली असता शासनाकडून आलेले अनुदान संपले असल्याचे तोंडी उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले. मात्र, प्रत्येक गावातील शेतकºयांच्या यादीप्रमाणे शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान काही गावांना वाटप न करताच संपले कसे?, यावरून महसूल विभाग दुष्काळाचा सामना केलेल्या शेतकºयांप्रति संवेदनशील नसल्याचे दिसून येते.
- भाऊसाहेब जाधव, उपसरपंच, लक्ष्मणपूर

Web Title: Awaiting drought subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.