बाजार समितीच्या मतदार यादीला हरकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:39 AM2018-02-23T00:39:29+5:302018-02-23T00:41:20+5:30

 Appeal to the voters list of market committee | बाजार समितीच्या मतदार यादीला हरकत

बाजार समितीच्या मतदार यादीला हरकत

googlenewsNext
ठळक मुद्देसटाणा, नामपूर : गण निश्चितीला हरकत; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पत्र

 

 

नाशिक : सहकार खात्याच्या नवीन कायद्यानुसार होऊ घातलेल्या सटाणा व नामपूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हरकत घेतली असून, संयुक्त व सामायिक खातेदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट न करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी मतदार यादीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सटाणा व नामपूर बाजार समितीच्या जाहीर झालेल्या मतदार याद्या पूर्णपणे सदोष आहेत. त्यात प्रामुख्याने संयुक्त व सामायिक खातेदारांची मतदार यादीत नावे समाविष्ट केलेली नसल्यामुळे खातेदारांचे क्षेत्र १० गुंठ्यापेक्षा जास्त असूनही सदर खातेदार हे मतदानापासून वंचित राहतील तसेच महसूल खात्याने पुरविलेल्या शेतकरी खातेदाराची यादी प्रमाणित नसतानाही प्रारूप यादी तयार करण्यात आली आहे.
बाजार समितीसाठ निश्चित करण्यात आलेल्या गणांची
गावे पाहता त्यातील काही गावे सटाणा तालुक्याच्या सीमेवर
आहेत व तेथील शेतकºयांना शेतीसाठी सटाणा येथून
कर्जपुरवठा केला जातो, परंतु शेतकरी हा लगतच्या देवळा, कळवण, मालेगाव तालुक्यात वास्तव्यास असल्यामुळे त्याचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्यात आला आहे. त्यामुळे या शेतकºयांनाही मतदानाचा हक्क मिळावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्टÑ प्रमुख दीपक पगार यांनी केली आहे. शेतकरी खातेदारांची संख्या निश्चित नसतानाही गण संख्या निश्चित कशी केली, असा सवालही विचारण्यात आला आहे. शेतकरी खातेदारांना सर्व गणातील उमेदवारांसाठी मतदान करण्याचा अधिकार दिला जावा तसेच शेतकरी यादीत मयत सभासदांची नोंदणी कमी न झाल्याने त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याने मतदार यादी सदोष असून, काही शेतकºयांची नावे एकापेक्षा अधिक गणामध्ये मतदार म्हणून नावे टाकण्यात आली आहेत.

Web Title:  Appeal to the voters list of market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.