न्यायालयातील साक्षीदारांवर दबाव आणणाऱ्या ६० संशयितांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 01:34 AM2018-10-09T01:34:50+5:302018-10-09T01:35:51+5:30

न्यायालयीन समन्स वा वारंट नसतानाही फौजदारी खटल्यातील साक्षीदारांना जिल्हा न्यायालय आवारात धमकावणा-या गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सोमवारी (दि़८) तब्बल तीन तास शोध मोहीम राबवून ६० संशयितांना ताब्यात घेतले़

 Action on 60 suspects under pressure from the court's witnesses | न्यायालयातील साक्षीदारांवर दबाव आणणाऱ्या ६० संशयितांवर कारवाई

न्यायालयातील साक्षीदारांवर दबाव आणणाऱ्या ६० संशयितांवर कारवाई

Next

नाशिक : न्यायालयीन समन्स वा वारंट नसतानाही फौजदारी खटल्यातील साक्षीदारांना जिल्हा न्यायालय आवारात धमकावणा-या गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सोमवारी (दि़८) तब्बल तीन तास शोध मोहीम राबवून ६० संशयितांना ताब्यात घेतले़ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील आळंदी देवाची येथील पाच संशयितांचा समावेश असून, या संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे़ जिल्हा न्यायालयातील विविध फौजदारी खटल्यांमध्ये गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे़ तपासी अधिकारी, साक्षीदार तसेच सरकारी वकील यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शिक्षेचे प्रमाण वाढले आहे़
पुणे जिल्ह्यातील पाच संशयित
जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर अ‍ॅडव्होकेटचा लोगो असलेली इनोव्हा कार (एमएच १४, जीआर ३००१) उभी होती़ या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये बेस बॉलचा दांडा, एक पातळ पत्रा, तारींचे आवरण, वादी बांधलेले दोन दांडे आढळून आले़
पोलिसांनी कारसह संशयित प्रमोद जियालाल गडरेल, श्याम जियालाल गडरेल, सागर जियालाल गडरेल, हेमंत फुलचंद इटोरिया,
धरम रमेश सोळंकी (रा़ आळंदी देवाची, ता़ खेड, जि़ पुणे) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली़ या पाचही संशयितांवर मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे़

Web Title:  Action on 60 suspects under pressure from the court's witnesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.