सामाजिक वनीकरण विभागामार्फत करणार ३ लाख ६१ हजार वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 07:34 PM2019-07-01T19:34:56+5:302019-07-01T19:38:57+5:30

वाडिवºहे : सामाजिक वनीकरण विभागाच्या अंतर्गत ‘एकच लक्ष ३३ कोटी वृक्ष’ याप्रमाणे १ ते ३१ जुलै २०१९ अंतर्गत इगतपुरी तालुक्यात तालुक्यात वनमहोत्सवाला सोमवार (दि १) पासून उत्साहात प्रारंभ करण्यात आला. ३१ जुलैपर्यंत चालणाऱ्या या वनमहोत्सवात ३ लाख ६१ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे.

3 lakh 61 thousand plantations done by the Social Forestry Department | सामाजिक वनीकरण विभागामार्फत करणार ३ लाख ६१ हजार वृक्षारोपण

इगतपुरी तालुक्यात तीन लाख ६१ हजार वृक्ष लागवडीचे लक्ष घेवून कृषीदिनी वृक्षारोपण करतांना वनपाल कचवे महेश वाघ, वनरक्षक नीलेश सरोदे, सरपंच गोकुळ सदगीर आणि ग्रामस्थ.

googlenewsNext
ठळक मुद्देशिरसाठे येथे वृक्ष लागवडीला सुरुवात करण्यात आली.

वाडिवºहे : सामाजिक वनीकरण विभागाच्या अंतर्गत ‘एकच लक्ष ३३ कोटी वृक्ष’ याप्रमाणे १ ते ३१ जुलै २०१९ अंतर्गत इगतपुरी तालुक्यात तालुक्यात वनमहोत्सवाला सोमवार (दि १) पासून उत्साहात प्रारंभ करण्यात आला. ३१ जुलैपर्यंत चालणाऱ्या या वनमहोत्सवात ३ लाख ६१ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या वतीने इगतपुरी तालुक्यात सर्व ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असून सोमवारी शिरसाठे येथे वृक्ष लागवडीला सुरुवात करण्यात आली. यावेळी वनक्षेत्रपाल अरुण सोनवणे, वनपाल दिलीप कचवे, महेश वाघ, वनरक्षक निलेश सरोदे, सरपंच गोकुळ सदगीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्याच प्रमाणे तालुक्यातील शिरसाठे, कुशेगाव, वैतरणा आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी सरपंच गोकुळ सदगीर, ग्रामपंचायत सदस्य श्याम सोपनर, काळू ढोनर, विलास चंदगीर, गणेश तेलनग, निवृत्ती एलमामे, एकनाथ सोपनर, गोटीराम कान्हव, रामदास सदगीर आदी उपस्थित होते.

Web Title: 3 lakh 61 thousand plantations done by the Social Forestry Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.