58 आरोग्य केंद्रांचे दूरध्वनी नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 01:05 PM2018-12-03T13:05:33+5:302018-12-03T13:05:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामीण जनतेच्या आरोग्याचा भार उचलणा:या 58 आरोग्य केंद्रांमध्ये लावलेले दूरध्वनी सध्या नावालाच आहेत़ ...

Phone number 58 health centers | 58 आरोग्य केंद्रांचे दूरध्वनी नावालाच

58 आरोग्य केंद्रांचे दूरध्वनी नावालाच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामीण जनतेच्या आरोग्याचा भार उचलणा:या 58 आरोग्य केंद्रांमध्ये लावलेले दूरध्वनी सध्या नावालाच आहेत़  आपत्कालीन स्थितीत संपर्कासाठी महत्त्वपूर्ण यंत्रणा असूनही ते पूर्ववत सुरु करण्याबाबत वर्षभरापासून कारवाई झालेली नसल्याने आरोग्य केंद्रे संपर्कहीन झाली आहेत़
नंदुरबार जिल्ह्यातील 58 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जिल्हा परिषदेने रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत़ यात दूरध्वनीचाही समावेश आह़े ग्रामीण भागात किंवा रस्त्यावर एखादी अपघाती घटना, साथरोग किंवा नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास आरोग्य केंद्रांमध्ये संपर्क करण्यासाठी दूरध्वनींची सोय 25 वर्षापूर्वी करण्यात आली होती़ कालांतराने दूरसंचार सेवेत झालेल्या प्रगतीमुळे कालांतराने दूरध्वनींचा वापर कमी झाला होता़ आरोग्य कर्मचा:यांशी मोबाईलद्वारे थेट संपर्क साधला जात असल्याने दूरध्वनींचे महत्त्व कमी झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आह़े मात्र आपत्कालीन स्थिती दूरध्वनी संपर्कासाठी सर्वाधिक चांगला पर्याय असून आरोग्य विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आह़े
 अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती होऊन 20 वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटूनही त्याठिकाणी दूरध्वनीची सोय करण्यात आरोग्य विभागाला यश आलेले नाही़ विशेष म्हणजे आरोग्य केंद्रांमध्ये लावलेल्या दूरध्वनींचे बिल हे जिल्हा परिषदेकडून निधीला मंजूरी दिली जात़े 
जिल्हा परिषदेकडून आरोग्य केंद्रांना दरवर्षी किमान पावणे दोन लाख रुपयांचा निधी हा रुग्ण कल्याण समितीद्वारे दिला जातो़ या निधीतून दूरध्वनींचा खर्च भागवण्याची तरतूद असूनही काही आरोग्य केंद्रांचे  दूरध्वनी हे बिल न भरल्याने बंद पडल्याची माहिती देण्यात आली आह़े 
नंदुरबार तालुक्यातील नटावद, आष्टे, राकसवाडा, लहान शहादे, ढेकवद, कोपर्ली, तळोदा तालुक्यातील सोमावल, प्रतापपूर, वाल्हेरी, बोरद, शहादा तालुक्यातील वडाळी, कहाटूळ, मंदाणा, प्रकाशा, पाडळदा, कुसूमवाडा, कलसाडी, वाघर्डे, सुलवाडा, आडगाव, सारंगखेडा, शहाणा, नवापूर तालुक्यातील प्रतापपूर चिंचपाडा, डोगेगाव, झामणझर, उमराण, वावडी, गताडी, पळसूून, धनराट विसरवाडी, अक्कलकुवा तालुक्यातील खापर, मोरंबा, काठी, ओहवा, होराफळी, मांडवा, जांगठी, वडफळी, डाब, जमाना, उर्मिलामाळ, पिंपळखुटा, ब्रिटीश अंकुशविहिर, धडगाव तालुक्यातील बिलगाव, खुंटामोडी, तेलखेडी, चुलवड, तलाई, धनाजे, राजबर्डी, कात्री, रोषमाळ, तोरणमाळ, मांडवी, सोन बुद्रुक आणि काकर्दा याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्यात आली आह़े यातील धडगाव तालुक्यातील सात केंद्राचे दूरध्वनी क्रमांक दिले गेले आहेत़ हे सर्व बंद असून उर्वरित चार ठिकाणी मोबाईल क्रमांकची सोय केली गेली आह़े हे क्रमांक नेटवर्कमध्ये असल्यावर वैद्यकीय अधिका:यांसोबत संपर्क होतो़ 
अक्कलकुवा तालुक्यातील मांडवा आरोग्य केंद्र वगळता इतर सर्व 11 आरोग्य केंद्रांमध्ये मोबाईल क्रमांकांची सोय करण्यात आली आह़े यासोबत कंजाला, सिंगपूर, गव्हाळी, आमली, आमलीबारी या केंद्रांमध्ये तसेच तरंगता दवाखान्यासाठी मोबाईलची सोय करण्यात आली आह़े याठिकाणी संपर्क होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आह़े 
दुर्गम भागात सुविधा पोहोचवण्यास अडचणींबाबत वेळावेळी पाठपुरावा होत असताना शहादा तालुक्यातील प्रकाशा, शहाणा, आडगाव, सुलवाडा वाघर्डे येथे दूरसंचार विभागाची केबल नसल्याने दूरध्वनीची सुविधा देण्यात आलेली नसल्याची माहिती देण्यात आली आह़े विशेष म्हणजे यातील प्रकाशा हे आरोग्य केंद्र ब:हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर असून देशभर तीर्थक्षेत्र म्हणूनही परिचित आह़े याठिकाणी आपत्कालीन सुविधा म्हणून या दूरध्वनीची सुविधा निर्माण करण्याची गरज असतानाही दुर्लक्ष करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े आजअखेरीस केवळ बोरद ता़ तळोदा आणि सारंगखेडा येथेच दूरध्वनी सुरु आहेत़परंतू तेथे संपर्क करुनही ते उचचले जात नसल्याचे अनुभव नागरिकांचे आहेत़ 
धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात आरोग्य कर्मचा:यांच्या मोबाईलवर संपर्क करुन तात्काळ सुविधा मिळत नसल्याचे सांगण्यात येत आह़े सपाटीच्या गावांमधील आरोग्य केंद्रांमध्ये दूरध्वनी बंद असल्याने रुग्णवाहिका आणि आपत्कालीन मदतीसाठी संपर्क करावा कोठे असा, प्रश्न नागरिकांकडून करण्यात येत आह़े नवापूर, शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यातून जाणा:या महामार्गालगतच्या आरोग्य केंद्रांमध्येही संपर्क करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या होत्या़ त्याकडेही आरोग्य विभागाकडून  दुर्लक्ष करण्यात आले आह़े 
दूरध्वनीचे कनेक्शन देण्यात आलेल्या सपाटीच्या गावातील सर्वच केंद्रांसाठी इंटरनेट सुविधाही देण्याचे आदेश आहेत़ यासाठी शासनाकडून स्वतंत्र पत्रक काढण्यात आल होत़े परंतू  केंद्रांना मोडेम मंजूर करुन इंटरनेट देण्याची कारवाई मात्र थंडबस्त्यात असल्याचे सांगण्यात आले आह़े काही ठिकाणी मोडेम आहेत परंतू संगणक नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले आह़े अनेकवेळा पाठपुरावा करुनही याबाबत योग्य ते निर्णय घेण्यात येत नसल्याची माहिती देण्यात आली आह़े 

Web Title: Phone number 58 health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.