राष्ट्रवादीतर्फे रविवारी जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:35 PM2018-02-16T12:35:07+5:302018-02-16T12:35:07+5:30

NCP attacked the district on Sunday | राष्ट्रवादीतर्फे रविवारी जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन

राष्ट्रवादीतर्फे रविवारी जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरीय हल्लाबोल आंदोलनाच्या तिस:या टप्प्यात नंदुरबार जिल्ह्यात सभा होणार आह़े याअंतर्गत 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता, विसरवाडी ता.नवापूर येथे हल्लाबोल सभा व त्यानंतर सायंकाळी 7 वाजता शहादा येथे मोटार सायकल रॅली काढून पालिकेजवळ सभा होणार आहे.
सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे, विधानसभेचे गटनेते जयंत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलीक, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा, महिला सेलच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह राष्ट्रवादीचे खासदार, आमदार तसेच विविध आघाडय़ा व सेलचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 
सभेत राज्यातील शेतक:यांना जाहिर कर्जमाफीचा अद्याप न मिळालेला लाभ, बोंडअळी, तुडतुडे रोगामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतीचे झालेले नुकसान, महागाई, बेरोजगारी, राज्यातील युवकांचे प्रश्न, राज्याच्या विविध भागात ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, राज्यातील विकासाचे प्रलंबित प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मते मांडणार आहेत़  
या सभेस पदाधिकारी व कार्यकत्र्यानी उपस्थिती देण्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, माजी आमदार शरद गावीत, शहादा तालुकाध्यक्ष ईश्वर पाटील, नवापूर तालुकाध्यक्ष विनायक गावीत, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, युवती सभेच्या अर्चना गावीत, महिला सभेच्या हेमलता शितोळे यांनी कळवले आह़े 

Web Title: NCP attacked the district on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.