नंदुरबार जिल्ह्यात 41 हजार मतदारांचे यादीत छायाचित्रच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:04 PM2018-05-18T13:04:48+5:302018-05-18T13:04:48+5:30

Nandurbar district is not in the list of 41 thousand voters! | नंदुरबार जिल्ह्यात 41 हजार मतदारांचे यादीत छायाचित्रच नाही !

नंदुरबार जिल्ह्यात 41 हजार मतदारांचे यादीत छायाचित्रच नाही !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील सर्वच मतदारांना आता रंगीत छायाचित्रासह रंगीत मतदार कार्ड दिले जाणार आहे. जिल्ह्यातील तब्बल 41 हजार मतदारांचे फोटो नसल्यामुळे त्यांचे कार्ड बनविणे बाकी आहे तर दोन हजार 480 मतदारांचे फोटो हे ब्लॅक अॅण्ड व्हाईट असल्यामुळे त्यांच्याकडून रंगीत छायाचित्र घेतले जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात 20 जूनर्पयत मतदार केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देणार असून मतदार यादी अद्ययावत केली जाणार आहे. 
येत्या जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमिवर जिल्ह्यातील मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम निवडणूक विभागाने सुरू केले आहे. त्याअंतर्गत आता प्रत्येक मतदाराला आकर्षक रंगीत मतदार कार्ड दिले जाणार आहे. त्यानुसार किती मतदारांचे कार्ड नाही, किती जणांकडे ब्लॅक अॅण्ड व्हाईट मतदार कार्ड आहे याची माहिती काढण्यात आली आहे. जिल्ह्यातील जवळपास 45 हजार मतदारांकडे मतदार कार्ड नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील 41 हजार मतदारांचे मतदार यादीत फोटोच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
फोटो मिळविणार
मतदार यादीत फोटो नसलेल्या 41 हजार मतदारांचे फोटो मिळविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मतदारांना आवाहन करण्यात येणार असून बीएलओदेखील घरोघरी जाऊन मतदार फोटो जमा करणार आहेत.
याशिवाय जिल्ह्यातील दोन हजार 480 मतदारांचे फोटो हे ब्लॅक अॅण्ड व्हॉईट स्वरूपातील आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे त्याच प्रकारचे मतदार कार्ड आहे. अशा मतदारांकडूनदेखील रंगीत फोटो मिळविण्यासाठी प्रय} सुरू आहेत. यापैकी 23 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे. आतार्पयत 706 मतदारांकडून रंगीत फोटो मिळविण्यात आले आहेत. 
मतदार केंद्र अधिकारी  आता घरोघरी जाणार
लोकसभा व इतर निवडणुकांच्या पाश्र्वभूमिवर मतदार याद्या अद्ययावतीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे यांनी सांगितले, मतदार याद्या अद्ययावतीकरणानुसार 20 जून र्पयत जिल्ह्यात मतदार केंद्रस्तरीय अधिकारी हे घरोघरी भेटी देणार आहेत. 1 जोनवारी 2019  या अर्हता दिनांकावर आधारित  मतदारांची माहिती घेऊन यादी करण्यात येणार आहे. त्याच दिनांकाच्या आधारावर 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांचे फॉर्म नमुना सहा भरून मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. याशिवाय मतदार यादीतील नोंदीची पडताळणीदेखील करण्यात येणार आहे. नाव व नोंदीतील दुरुस्ती, मयत, दुबार, कायमस्वरूपी स्थलांतरित यांची नावे वगळण्याची कार्यवाहीदेखील करण्यात येणार आहे. याअंतर्गत प्राप्त होणारे अर्ज हे इरोनेट द्वारे कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच मतदार नोंदणी अधिकारी व साहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर प्राप्त होणारे दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहे.
सर्वानाच प्रशिक्षण
या कामासाठी नेमलेल्या सर्वच कर्मचा:यांना यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याअंतर्गतच ते कार्यवाही करणार आहेत. संबंधितांना साहित्याचेदेखील वाटप करण्यात आले असून त्याद्वारे सुरुवातही करण्यात आली आहे.

Web Title: Nandurbar district is not in the list of 41 thousand voters!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.