तीन एकरांत ६० क्विंटल हळदीचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:30 AM2019-04-08T00:30:12+5:302019-04-08T00:30:35+5:30

तालुक्यात सर्वत्र कापूस, हरभरा, तूर, सोयाबीन, उडदाची शेती केली जाते़ मात्र, अलीकडच्या काळात ही शेती परवडण्याजोगी राहिलेली नाही़ त्यामुळे शेतकरी पारंपरिक ज्ञानाच्या भरवशावर इतर पिकांकडे वळत आहे. बडूर येथील श्रीनिवास जाधव (वय ३०) या तरुण शेतकऱ्याने ३ एकर शेतीत ६०० क्विंटल हळदीचे उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.

Three acres of 60 quintals of turmeric production | तीन एकरांत ६० क्विंटल हळदीचे विक्रमी उत्पादन

तीन एकरांत ६० क्विंटल हळदीचे विक्रमी उत्पादन

Next

शेख इलियास ।

बिलोली : तालुक्यात सर्वत्र कापूस, हरभरा, तूर, सोयाबीन, उडदाची शेती केली जाते़ मात्र, अलीकडच्या काळात ही शेती परवडण्याजोगी राहिलेली नाही़ त्यामुळे शेतकरी पारंपरिक ज्ञानाच्या भरवशावर इतर पिकांकडे वळत आहे. बडूर येथील श्रीनिवास जाधव (वय ३०) या तरुण शेतकऱ्याने ३ एकर शेतीत ६०० क्विंटल हळदीचे उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.
बिलोली तालुक्यात सर्वाधिक सोयाबीन, उडीद, तूर पिकाची शेती केली जाते़ मात्र उत्पादन खर्च अधिक, उत्पन्न कमी या प्रकारामुळे सोयाबीन, उडीद, तूर पिकामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. तालुका मुख्यालयापासून ७ किमी अंतरावर असलेल्या बडूर येथील तरुण शेतकरी श्रीनिवास जाधव यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले़ बालपणापासूनच श्रीनिवास जाधव यांना शेतीची आवड होती.
वडिलोपार्जित शेतजमिनीत स्वत:च्या कल्पनेतून दरवर्षी नवनवीन प्रयोग करीत असतात. मात्र यावर्षी त्यांनी ३ एकर शेतीत हळदीची लागवड केली होती. त्यांना ठिबक, खत काढणी, जैविक फवारणी याकरिता ९० हजार रुपये खर्च आला तर उत्पन्न पाचपट झाले आहे. मध्यंतरी निसर्गाच्या अवकृपेने दगा दिला असला तरी ३ एकरांत ६०० क्विंटल हळदीचे उत्पादन झाले़ या उत्पन्नातून त्यांना २० लाख रुपये नफा मिळाला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
आजची तरुणाई तोट्याच्या गर्तेत अडकलेल्या शेती व्यवसायाकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येत असतानाच बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणाने शेतीवरील जीवापाड प्रेम इतर शेतकऱ्यांसाठी आदर्शवत आहे. तालुक्यातील सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा, कापूस पीक घेणाºया शेतकऱ्यांनी श्रीनिवास जाधव यांचा आदर्श घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

सर्वत्र शेतकरी दुष्काळीस्थितीत अडकल्याने आत्महत्या करतोय, कर्जबाजारी होतो. परंतु, हीच शेती पारंपरिक पद्धतीने केल्यास अशा परिस्थितीचा सामना करता येतो. मला बालपणापासूनच शेतीची आवड होती. मी तेलंगणा राज्यातील विजयवाडा येथील 'टर्मरिक मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या तज्ज्ञांकडून या हळदीचे बेणे आणले आहे. आदर्श शेती ही नियोजनातून निर्माण करता येते.
-श्रीनिवास जाधव, शेतकरी बडूर

Web Title: Three acres of 60 quintals of turmeric production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.