स्वारातीम विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत काँग्रेसच्या ज्ञानतीर्थ पॅनलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 11:15 AM2017-11-02T11:15:13+5:302017-11-02T11:18:43+5:30

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत ज्ञानतीर्थ पॅनलने १० पैकी ९ जागांवर विजय मिळवून वर्चस्व निर्माण केले़  केवळ एका जागेवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचला यश मिळाले़

Swaratim University's Senate election dominates the knowledge-tech panel of the Congress | स्वारातीम विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत काँग्रेसच्या ज्ञानतीर्थ पॅनलचे वर्चस्व

स्वारातीम विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत काँग्रेसच्या ज्ञानतीर्थ पॅनलचे वर्चस्व

googlenewsNext
ठळक मुद्दे १० पैकी ९ जागांवर ज्ञानतीर्थने मिळविला विजय, एक जागा अभाविपकडेमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठाच्या अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधरांच्या पदवीधर मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठी मतदान झाले

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत ज्ञानतीर्थ पॅनलने १० पैकी ९ जागांवर विजय मिळवून वर्चस्व निर्माण केले़  केवळ एका जागेवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचला यश मिळाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठाच्या अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधरांच्या पदवीधर मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठी रविवारी मतदान पार पडले.

३१ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या हॉल क्र. ३११ मध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. रात्री तीन वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होती़ पदवीधर मतदार संघातील सर्वसाधारण गटातून निवडून द्यावयाच्या पाच जागांसाठी १५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या गटामध्ये एकूण मतदान ६८७७ झाले़  यामध्ये ७२६ अवैध मतदान झाले. अकराव्या फेरीअखेर ज्ञानतीर्थ पॅनलचे विक्रम पंतंगे यांना १०४८, युवराज पाटील यांना ९८९, नारायण चौधरी यांना ९६३, महेश मगर यांना ८७९ तर विद्यापीठ विकास मंचचे संदीप जगदाळे यांना ७५८ मते मिळाली़  त्यांना सर्वसाधारण गटामधून विजयी घोषित करण्यात आले. 

पदवीधर मतदारसंघातील महिला गटातून निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या गटामध्ये एकूण मतदान ६८७७ झाले असून यामध्ये अवैध मतदान ७१४ झाले. पहिल्याच फेरीमध्ये मीनाक्षी खंदाडे या ३२५५ मते घेऊन विजयी झाल्या. पदवीधर मतदारसंघातील अनुसूचित जाती गटातून निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या गटामध्ये एकूण मतदान ६८७७ झाले असून यामध्ये अवैध मतदान ६८९ झाले. या गटामध्ये अजय गायकवाड २८८१ मते घेऊन विजयी झाले. पदवीधर मतदारसंघातील अनुसूचित जमाती गटातून निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या गटामध्ये एकूण मतदान ६८७७ झाले असून यामध्ये अवैध मतदान ६७४ झाले. या गटामध्ये पहिल्याच फेरीमध्ये परशराम कपाटे ३३०४ मते घेऊन विजयी  झाले.

पदवीधर मतदारसंघातील निरधिसूचित जमाती (विमुक्त जमाती किंवा भटक्या जमाती) गटातून निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या गटामध्ये एकूण मतदान ६८७७ झाले असून यामध्ये अवैध मतदान ६५३ झाले. या गटामध्ये पहिल्याच फेरीमध्ये गजानन असोलेकर ३६९७ मते घेऊन विजयी झाले.  इतर मागासवर्ग गटातून निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या गटामध्ये एकूण मतदान ६८७७ झाले असून यामध्ये अवैध मतदान ७३२ झाले. या गटामध्ये बालाजी विजापुरे २७३६ मते घेऊन विजयी झाले.

मतमोजणीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, प्र- कुलगुरु डॉ. गणेशचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी कुलसचिव डॉ. रमजान मुलानी, विशेष कार्यासन अधिकारी डॉ. शांतीनाथ बनसोडे, डॉ.डी.बी. पानसकर, उपकुलसचिव डॉ. श्रीकांत अंधारे, पी.एन. कांबळे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहा. कुलसचिव रामदास पेद्देवाद, डॉ.डी.एम. तंगलवाड, डॉ.डी.डी.पवार, डॉ.सुरेंद्र्र रेड्डी, अधीक्षक संजय गाजरे, डी.जी. उरे, रामचंद्र शेंबोले, शिवराम लुटे, विकास जाधव, निवडणूक विभागातील सर्व कर्मचारी यांच्यासह विद्यापीठ परिसरातील शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.

विजयी उमेदवार
काँग्रेस पुरस्कृत ज्ञानतीर्थ पॅनलचे विजयी उमेदवार -विक्रम पंतगे, युवराज पाटील, नारायण चौधरी, महेश मगर, मीनाक्षी खंदाडे, अजय गायकवाड, परशराम कपाटे, गजानन असोलेकर, बालाजी विजापुरे. अभाविप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचच्या एकमेव संदीप जगदाळे यांचा विजय झाला़

Web Title: Swaratim University's Senate election dominates the knowledge-tech panel of the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.