ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने रिक्षाला चिरडले;पती-पत्नी ठार,१७ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 09:09 PM2021-08-16T21:09:00+5:302021-08-16T21:09:55+5:30

जखमींना वाहनातून जेसीबीच्या साहायाने बाहेर काढण्यात आले

A rickshaw was crushed by a failed brake truck; husband and wife were killed and 17 others were injured | ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने रिक्षाला चिरडले;पती-पत्नी ठार,१७ जण जखमी

ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने रिक्षाला चिरडले;पती-पत्नी ठार,१७ जण जखमी

Next

कंधारः बस स्थानकाकडून येणाऱ्या आयशर ट्रकचे ( क्रमांक एम एच १३ आर २२२४ ) ब्रेक निकामी झाल्याने महाराणा प्रताप चौकात रिक्षावर आदळले. या भीषण अपघातात गोविंद सटवाजी भंगारे (६५) व मथुराबाई गोविंद भंगारे (५५) हे पती-पत्नी अपघातात ठार झाले. तर इतर १७ जण जखमी झाले आहेत. ८ गंभीर जखमींना नांदेडला उपचारासाठी पाठविण्यात आले.

 शहरात दि.१६ ऑगस्ट रोजी आठवडी बाजार होता. भाजीपाला , फळभाज्या व फळ खरेदीसाठी गर्दी होती. दुपारी ४.३० ते ५ च्या सुमारास लोहाकडून येणारे आयचर ट्रक वाहन सिंमेट गटू घेऊन हानेगावला जात होते. परंतु, बसस्थानका जवळ वाहनाचे ब्रेक निकामी झाले. ट्रक थेट रिक्षा ( क्रं एम.एच.२६ बीक्यू १९३४) वर आदळले.त्यामुळे त्या वाहनातील ३ प्रवासी गंभीर जखमी झाले. यातील गोविंद सटवाजी भंगारे व मथुराबाई गोविंद भंगारे यांना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.परंतु डॉक्टरांनी पती-पत्नीला मृत घोषित केले.

तसेच दुचाकी (क्रमांक एम एच २६ एस ३५७१) या वाहनाचे नुकसान झाले.अपघातात इतर  १७ जण जखमी झाले. त्यात गंभीर ८ जणांना नांदेडला उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती ग्रामीण रूग्णालयाच्या वतीने देण्यात आली.

जखमीची नांवे अशी १)रामेश्वर बालाजी भंगारे वय १७ रा बाबुळगाव २)शेख जावेद ६० रा हतईपूरा ३)शेख जाकिर २५ हत्तईपूरा ४) शेख रऊफ शेख घडी ४५ दर्गापूरा ५ )लक्ष्मीबाई सोपान वाघमारे ६५ रा.शेकापूर ६)शेख महेमूद ५० दर्गापूरा ७) नामदेव लक्ष्‍मण जाधव ४६ रा भोजूतांडा ८)बालाजी केशव मुंडे ३० बाबुळगाव ९)आदिनाथ मारोती जायभाये २१ बोरी १०)सत्तार खान अहमद खान वय ३४ वर्षं हतईपुरा ११) तनवीर हुसेन ३२ दर्गापूरा १२)शेख सद्दाम शेख हुसेन वय २७ वर्ष १३)भिवसन जळबा भंगारे वय ६० वर्ष बाबूळगाव १४)शंकर गंगाराम वय २५ वर्ष  १५)  शेख गौस शेख नबीसाब कंधार वय २९ वर्ष १६)शेख नसीब खान कंधार वय २९ वर्ष १७) माधव जायभाये बोरी वय ४५ वर्ष यांचा जखमीत समावेश आहे.

अपघात झाल्यानंतर घटनास्थळी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे,पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे,सहाय्यक पो.नि. सातानुरे, संग्राम जाधव ,गणाचार्य ,सुनील पत्रे,गुरूनाथ कारामुंगे आदी दाखल झाले.नगरसेवक अ.मन्नान चौधरी, प्रा.डॉ. पुरूषोत्तम धोंडगे, माजी सैनिक विकास समितीचे जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड,स्वप्नील लुंगारे,अँड.कलीम अन्सारी , परशुराम केंद्रे,शेख  युनुस आदीनी मदत केली.खाजगी जेसीबी आणून वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले.
  जखमीवर ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. रवी पोरे ,डॉ. भगवान जाधव ,डॉ. रामभाऊ तायडे,डॉ. यशवंत तेलंग, डॉ. संतोष पदमवार,डॉ. सय्यद जिलानीसह अधिपरिचारीका नंदा सोनकांबळे, शितल कदम,शिल्पा केळकर,योगेश्वरी कबीर ,सत्वशीला कांबळे,अशोक दुरपडे ,गजानन केंद्रे आदीनी सहकार्य केले. या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.

Web Title: A rickshaw was crushed by a failed brake truck; husband and wife were killed and 17 others were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.