किवळा प्रकल्प जलसंपदामार्फतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:39 AM2018-12-28T00:39:24+5:302018-12-28T00:39:46+5:30

तालुक्यातील किवळा येथील साठवण तलाव जलसंपदा विभागाच्या निधीतूनच करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे़ महापालिकेने या तलावासाठीच्या खर्चास असमर्थतता दर्शविल्यानंतर शासनाकडे फेरप्रस्ताव सादर केला होता़

The Kivla project is through water resources only | किवळा प्रकल्प जलसंपदामार्फतच

किवळा प्रकल्प जलसंपदामार्फतच

Next
ठळक मुद्देमनपाने दर्शविली होती खर्च करण्यास असमर्थता

नांदेड : तालुक्यातील किवळा येथील साठवण तलाव जलसंपदा विभागाच्या निधीतूनच करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे़ महापालिकेने या तलावासाठीच्या खर्चास असमर्थतता दर्शविल्यानंतर शासनाकडे फेरप्रस्ताव सादर केला होता़ १६़७३ दलघमी पाणीसाठा या तलावात होणार असून याचा लोहा आणि नांदेड तालुक्यातील गावांना सिंचनासाठी लाभ मिळणार आहे़
राज्य शासनाच्या सुधारित जलनियोजनानुसार विष्णूपुरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात किवळा साठवण तलाव बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ विष्णूपुरी प्रकल्पाच्या मान्यताप्राप्त जलनियोजनानुसार विष्णूपुरी बंधारा स्थळी केंद्रिय जल आयोगाने मान्यता दिलेल्या ११़४० अब्ज घनफूट पाणीवापराऐवजी केवळ ४़१० अब्ज घनफूट पाण्याचाच वापर होत आहे़ शिल्लक ७़३० अब्ज घनफूट पाण्याचा वापर करण्यासाठी गोदावरी नदीवर विष्णूपुरी प्रकल्पाच्या भाग २ अंतर्गत बंधाऱ्यांची श्रृंखला प्रस्तावित करण्यात आली आहे़ किवळा साठवण तलावात १६़७३ दलघमी उपयुक्त जलसाठा अपेक्षीत आहे़ यापैकी सिंचनासाठी ३़३५ आणि बिगरसिंचनाकरिता १२ दलघमी पाणी वापरले जाणार आहे़
पावसाळ्यात विष्णूपुरीतून तेलंगणा राज्यात वाहून जाणारे हक्काचे पाणी उपसा करून किवळा साठवण तलावात सोडले जाणार आहे़ विष्णूपुरी प्रकल्पास पुरक साठवण व्यवस्था म्हणून हा तलाव उपयोगी राहणार आहे़ तर विष्णूपुरीच्या लाभक्षेत्रात ६७० हेक्टर क्षेत्र नव्याने सिंचनाखाली येणार आहे़ तसेच सिडको व औद्योगिक वसाहतीसाठी १२ दलघमी जलसाठा उपलब्ध होणार आहे़
विष्णूपुरी प्रकल्पाच्या प्रस्तावित पंचम सु़प्ऱमा़ नुसार किवळा साठवण तलावाणी एकूण किंमत ४३ कोटी ७६ लाख इतकी आहे़ त्यात भूसंपादनासाठी २७ कोटी आणि कामासाठी १६़७६ लागणार आहे़ बुडीतक्षेताच्या भूमी अधिग्रहणासाठी भूधारकांची सहमती आहे़ भूधारक लाभक्षेत्रातील ६ गावातील शेतकरी, जता व या भागातील लोकप्रतिनिधी प्रकल्प पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आग्रही आहेत़ निधी उपलब्ध झाल्यास जून २०२० पर्यंत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षाही जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे़
किवळा साठवण तलावाच्या कामासाठी १४ कोटी ६१ लाख रूपये किंमतीची निविदा मंजूर झालेली आहे़ कार्यारंभ आदेशही ११ नोव्हेंबर २०१३ रोजी देण्यात आले आहेत़ या तलावाच्या बुडीत क्षेत्रासाठी बाभुळगाव, किवळा व ढाकणी या तीन गावातील १४७ हेक्टर जमीन लागणार आहे़ तीनही गावांतील जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे़ भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात २५ टक्के रक्कम अर्थात ४ कोटी ७५ लाख रूपये मागणी करण्यात आली असल्याने प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

Web Title: The Kivla project is through water resources only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.