नागपुरात होतोय ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’, सलग तीन दिवस दरवळणार संत्रा, रंगारंग कार्यक्रम विविध स्पर्धा अन् पुरस्कारांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:41 AM2017-12-12T00:41:52+5:302017-12-12T00:42:07+5:30

नागपुरी संत्रा म्हणजे जगप्रसिद्ध गोष्ट. या शहराचे उपनाव पडले तेच मुळात आॅरेंज सिटी. परंतु मागच्या काही वर्षात ही ओळख जरा पुसट होत चालली होती. हे चित्र बदलून संत्रा उत्पादनाच्या बळावर वैदर्भीय कृषी व्यवस्थेला नवे बळ देण्यासाठी नागपुरी संत्र्याला जगाच्या कानाकोप-यात पोहोचविण्यासाठी १६, १७ व १८ डिसेंबर रोजी नागपुरात ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येत आहे.

'World Orange Festival', which is being organized in Nagpur, isolated for three consecutive days, various events and awards for colorful events. | नागपुरात होतोय ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’, सलग तीन दिवस दरवळणार संत्रा, रंगारंग कार्यक्रम विविध स्पर्धा अन् पुरस्कारांचा पाऊस

नागपुरात होतोय ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’, सलग तीन दिवस दरवळणार संत्रा, रंगारंग कार्यक्रम विविध स्पर्धा अन् पुरस्कारांचा पाऊस

Next

नागपूर : नागपुरी संत्रा म्हणजे जगप्रसिद्ध गोष्ट. या शहराचे उपनाव पडले तेच मुळात आॅरेंज सिटी. परंतु मागच्या काही वर्षात ही ओळख जरा पुसट होत चालली होती. हे चित्र बदलून संत्रा उत्पादनाच्या बळावर वैदर्भीय कृषी व्यवस्थेला नवे बळ देण्यासाठी नागपुरी संत्र्याला जगाच्या कानाकोप-यात पोहोचविण्यासाठी १६, १७ व १८ डिसेंबर रोजी नागपुरात ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवाबाबत अवघ्या महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला पोहोचली असून विविध शहरातून लोक कुटुंबासह या महोत्सवात येण्याच्या तयारीला लागले आहेत. यूपीएल समूह हे या महोत्सवाचे प्रमुख प्रायोजक असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सहकार्याने तो आयोजित केला आहे. हे लोकमतचे इनिशिएटिव्ह आहे. १६ डिसेंबर रोजी नागपुरातील सुरेश भट सभागृहात या महोत्सवाचे उद्घाटन होईल. या महोत्सवात संगीत, कला, नृत्याची मेजवानी असेल. पण याहून महत्त्वाचे म्हणजे संत्रा उत्पादक शेतकºयांना संत्रा लागवडीपासून ते संत्रा वाहतुकीपर्यंतच्या ‘आॅरेंज व्हॅल्यू चेन’ची माहिती विविध चर्चासत्र आयोजित करून दिली जाईल.

टायगरसोेबतच आॅरेंज टुरिझम
विदर्भात पर्यटक जसे वाघ बघायला येतात तसे यापुढे त्यांनी संत्र्याची चव चाखायला यावे, हा या महोत्सवाचा उद्देश आहे. या महोत्सवादरम्यान संत्र्याच्या बागांमध्ये सहल आयोजित केली जाणार आहे. हा ख्रिसमसच्या सुट्यांचा काळ आहे. या सुट्यांमध्ये महाराष्ट्रभरातील लोकांना आपल्या कुटुंबासह महोत्सवाचा आनंद लुटता येणार आहे.

मनोरंजनाची धमाल : या महोत्सवादरम्यान अवघ्या शहरात मनोरंजनाची धमालही अनुभवता येणार आहे. यामध्ये हिंदी-मराठी नाटकांसह विविध कलावंतांचे नृत्य, गायन व वादनाचा आनंद नागपूरकरांना लुटता येणार आहे. याक्रमात अनुप सोनी आणि स्मिता बन्सल या कलावंतांशी संवाद, रुपमती जॉली आणि लकी केनी यांचे सुफी गायन, इंडियन गॉट टॅलेंट-२०१६ चा विजेता सुलेमानचे सुरेल बासरी वादन, भारतातील नामवंत डीजेंचे सादरीकरण व प्रसिद्ध गायक बेनी दयाल याच्या सुरमयी आवजाच्या मेजवानीचा समावेश आहे.

भरभरून संत्री खाणार : या महोत्सवाच्या निमित्ताने नागपुरी संत्र्यांची प्रत्यक्ष चव चाखता येणार आहे. तब्बल तीन दिवसांचा प्लॅन करून आम्ही नागपूरला येतोय. मुलांची उत्सुकता तर शिगेला पोहोचली आहे. आम्ही सगळे भरभरून संत्रे खाणार आहोत आणि बॅण्ड, डीजे, नाटक आणि अ‍ॅडवेंचरस गेम्सचा थरारही अनुभवणार आहोत. - ममता शिंदे, मुंबई

आमची बॅग पॅक झालीय : ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ नागपुरात होत आहे हे कळल्यापासून आमच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे. रसाळ संत्र्याच्या बागा कशा असतात हे मुलांना दाखवायचे आहे. बॅगचे पॅकिंगही झाले आहे. ही सर्व धमाल अनुभवायला महोत्सवाच्या एक दिवसाआधीच आम्ही नागपुरात दाखल होतोय.
- गुणवंत कुळकर्णी, पुणे

या महोत्सवाची अधिक अपडेट माहिती
Facebook.com/worldorangefestival, 
Twitter.com/ worldorangefest, instagram.com/worldorangefestival, www.worldorangefestival.com यावर मिळेल.

Web Title: 'World Orange Festival', which is being organized in Nagpur, isolated for three consecutive days, various events and awards for colorful events.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर