पोलीस कारवाईच्या भीतीने नागपुरात महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:45 AM2018-01-31T00:45:01+5:302018-01-31T00:46:07+5:30

पोलिसांकडे तक्रार झाल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या एका महिलेने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. सारिका प्रदीप धुमाळ (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे. ती स्वावलंबीनगरात राहात होती.

The woman committed suicide in Nagpur due to police action | पोलीस कारवाईच्या भीतीने नागपुरात महिलेची आत्महत्या

पोलीस कारवाईच्या भीतीने नागपुरात महिलेची आत्महत्या

Next
ठळक मुद्देप्रतापनगर भागातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांकडे तक्रार झाल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या एका महिलेने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. सारिका प्रदीप धुमाळ (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे. ती स्वावलंबीनगरात राहात होती.
तिने त्रिभुवननाथ गाढवे याच्याकडून काही रक्कम घेतली होती. गाढवेने तिची प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवता सारिका धुमाळ हिने नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने १० लाख रुपये घेतले आणि नोकरी लावून दिली नाही किंवा रक्कमही परत केली नाही, असे तक्रारीत नमूद करून फसवणुकीचा आरोप लावला. या प्रकरणाची पोलीस चौकशी करीत आहेत. मात्र फसवणुकीच्या आरोपाचा गवगवा झाल्याने सारिका वैफल्यग्रस्त झाली आणि तिने सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणावर झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. आज सकाळी ती झोपेतून उठलीच नाही. त्यामुळे मुलगा व मुलीने तिला उठविण्याचा प्रयत्न केला असता ती मृत झाल्याचे लक्षात आले. तिने मृत्युपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात संपूर्ण घटनाक्रमाचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. प्रतापनगर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला. पुढील चौकशी सुरू आहे.

Web Title: The woman committed suicide in Nagpur due to police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.