नागपुरात स्कीन क्लिनिकच्या नावाखाली कुंटणखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:58 AM2018-03-31T00:58:55+5:302018-03-31T00:59:08+5:30

स्पा आणि स्कीन क्लिनिकच्या नावाखाली सुरू असलेल्या मानेवाड्यातील एका कुंटणखान्यावर परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी छापा मारला. या ठिकाणी पोलिसांनी तीन महिलांना वेश्याव्यवसाय करताना रंगेहात पकडले.

Under the name of Skin Clinic found brothel in Nagpur |  नागपुरात स्कीन क्लिनिकच्या नावाखाली कुंटणखाना

 नागपुरात स्कीन क्लिनिकच्या नावाखाली कुंटणखाना

Next
ठळक मुद्देडीसीपी भरणेंच्या पथकाचा छापा : तीन महिलांना पकडले : कुंटणखाना चालविणारे दोघे गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्पा आणि स्कीन क्लिनिकच्या नावाखाली सुरू असलेल्या मानेवाड्यातील एका कुंटणखान्यावर परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी छापा मारला. या ठिकाणी पोलिसांनी तीन महिलांना वेश्याव्यवसाय करताना रंगेहात पकडले. हा कुंटणखाना चालविणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून आक्षेपार्ह्य साहित्य जप्त केले. अत्यंत पॉश असा हा कुंटणखाना गेल्या चार महिन्यांपासून सुरू होता, असे प्राथमिक चौकशीतून उघड झाले आहे.
रंजित पांडुरंग मस्के (वय ३७) आणि रवी सूरजदास उदयकर (वय ३५, दोघेही रा. पारडी) अशी आरोपींची नावे आहेत. मस्के आणि उदयकरच्या जोडगोळीने मानेवाड्यातील शारदा चौकात एक सदनिका १२ हजार रुपये महिना भाड्याने घेतली होती. त्यांनी सदनिकेत मियामी स्पा आणि स्कीन क्लिनिक सुरू केले होते. वेश्याव्यवसाय करणाºया अनेक महिला-मुलींच्या ते संपर्कात होते. त्यांच्याकडे पाच ते दहा वारांगना दिवसभरात येत जात होत्या. येथे येणाºया ग्राहकाला वेगवेगळी रक्कम घेऊन ते रूम आणि महिला किंवा तरुणी उपलब्ध करून द्यायचे. १५०० रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंतचा मोबदला घेऊन एक तासासाठी महिला-मुलगी उपलब्ध करून द्यायचे. या कुंटणखान्याची माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांना मिळाली. त्यावरून त्यांनी आपल्या सहकाºयांना शहानिशा करण्यास सांगितले. कुंटणखाना सुरू असल्याची खात्री पटल्याने डीसीपी भरणे यांनी आज दुपारी ४ च्या सुमारास तेथे पंटरला (बनावट ग्राहक) पाठविले. पंटरकडून आरोपी मस्के आणि उदयकरने १५०० रुपये घेतल्यानंतर त्याला एक महिला आणि दोन तरुणी दाखविल्या. त्यानंतर त्याला एक रुम उपलब्ध करून दिली. कुंटणखान्याच्या परिसरातच पोलिसांचा ताफा दबा धरून होता. पंटरने इशारा करताच पोलिसांनी तेथे छापा घातला. देहविक्रय करणाºया तीन महिलांना तसेच आरोपी मस्के आणि उदयकरला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना हुडकेश्वर ठाण्यात नेण्यात आले.

पोलीस ठाण्यात आरोपींना विचारपूस केली असता कुंटणखाना चालविणारा मस्के तसेच उदयकर अनेक दिवसांपासून या गोरखधंद्यात सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले.
एक घटस्फोटित, दोघी बहिणी
विशेष म्हणजे, मस्केची एक दुरावलेली मैत्रिण या धंद्यात अजूनही सक्रिय असून, तिनेच याबाबत बोभाटा केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, कुंटणखान्यावर पकडलेल्या गेलेल्यापैकी एक महिला दोन मुलांची आई आहे. तिने पतीपासून घटस्फोट मिळावा म्हणून, न्यायालयात प्रकरण नेले असून, या कुंटणखान्यावर एक महिन्यापासून देहविक्रय करीत असल्याचे तर अन्य दोघी बहिणी आहेत. त्या प्रारंभी एका हॉस्पिटलमध्ये काम करायच्या. या धंद्यात कमी वेळेत जास्त रक्कम मिळत असल्याने त्यांनी येथे सेवा देणे सुरू केल्याचे समजते.
---
ठाण्यातील पोलीस अनभिज्ञ
विशेष म्हणजे, वर्दळीच्या ठिकाणी सुरू असलेल्या या कुंटणखान्याकडे हुडकेश्वर पोलिसांचे लक्ष नव्हते, ही बाब संशयास्पदआहे. त्याचमुळे की काय, पोलीस उपायुक्त भरणे यांनी या कारवाईत नंदनवनचे सहायक पोलीस निरीक्षक काचोरे, एपीआय बावणकर, मनोज, बजरंग, अशोक तसेच इमामवाड्याचे सुशांत, आरपीटीसी सचिन, उत्कर्ष राऊत यांच्याकडून ही छापामार कारवाई करून घेतली.

Web Title: Under the name of Skin Clinic found brothel in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.