रॉंगसाईड मेटॅडोरचा थरार, देवीदर्शनाला जाणाऱ्या दुचाकीस्वाराला चिरडले

By योगेश पांडे | Published: October 16, 2023 04:20 PM2023-10-16T16:20:05+5:302023-10-16T16:21:43+5:30

पघातानंतर मॅटेडोरचालक घटनास्थळावरून फरार

The thrill of a wrong side matador, crushes a biker who's going to Devdarshan | रॉंगसाईड मेटॅडोरचा थरार, देवीदर्शनाला जाणाऱ्या दुचाकीस्वाराला चिरडले

रॉंगसाईड मेटॅडोरचा थरार, देवीदर्शनाला जाणाऱ्या दुचाकीस्वाराला चिरडले

नागपूर : रॉंग साईड आलेल्या भरधाव मेटॅडोरने अगोदर एका कारला धडक दिली व त्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला चिरडले. यात दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाला. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

रविवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. संगमलाल रामसुख पांडे (६९, बावणे ले आऊट) असे मृतकाचे नाव आहे.  ते त्यांच्या मोटारसायकलने वेणा टी पॉईन्ट, अमरावती रोड, येथून कालीमातेच्या दर्शनाला जात होते. त्यावेळी एमएच ३५ ०९७२ या मॅटेडोरच्या चालकाने रॉंगसाईड वाहन चालवत नागपुरकडे जाणाऱ्या एम. एच ३१ ई. यू ३०४४ या कारला धडक दिली. त्यानंतर मॅटेडोर पांडे यांच्या गाडीवर धडकली. यात ते गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्यांना उपचाराकरीता एका खासगी इस्पितळात नेले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सोबतच कारमधील दोन ते तीन लोकदेखीलहे जखमी झाले. अपघातानंतर मॅटेडोरचालक घटनास्थळावरून फरार झाला. पांडे यांचा मुलगा अतुल याच्या तक्रारीवरून वाडी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

Web Title: The thrill of a wrong side matador, crushes a biker who's going to Devdarshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.