नागपुरातील अजनीत धार्मिक स्थळ तोडण्यावरून तणाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:41 AM2018-08-01T00:41:54+5:302018-08-01T00:42:07+5:30

अजनी पोलीस ठाण्याजवळील एक धार्मिक स्थळ तोडण्यासाठी मंगळवारी दुपारी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. यामुळे तणाव निर्माण झाल्याने काही वेळासाठी कारवाई थांबविण्यात आली. शेवटी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र, यानंतरही काही संघटनांनी विरोध केल्यामुळे मुदत देऊन पथक पुढे सरकले.

Tension in Ajani on demolition of a religious place | नागपुरातील अजनीत धार्मिक स्थळ तोडण्यावरून तणाव 

नागपुरातील अजनीत धार्मिक स्थळ तोडण्यावरून तणाव 

Next
ठळक मुद्दे महापालिकेची धंतोली, धरमपेठ, सतरंजीपुरामध्ये कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनी पोलीस ठाण्याजवळील एक धार्मिक स्थळ तोडण्यासाठी मंगळवारी दुपारी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. यामुळे तणाव निर्माण झाल्याने काही वेळासाठी कारवाई थांबविण्यात आली. शेवटी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र, यानंतरही काही संघटनांनी विरोध केल्यामुळे मुदत देऊन पथक पुढे सरकले.
पथकाने दुपारी राजाबाक्षा येथील विश्राम सोसायटीमधील एक धार्मिक स्थळ तोडले. अजनी रेल्वे कॉलनी रोडवरील अजनी रेल्वे ट्रॅफिक पोलीस स्टेशन गार्डनला लागून असलेल्या फूटपाथवरील एक छोटे धार्मिक स्थळ हटविण्यात आले. नरेंद्रनगर सुंदरबन रिंग रोड येथील एक व नरेंद्रनगर पुलाजवळील एक धार्मिक स्थळ तोडण्यात आले. याशिवाय अन्य पथकांनी धरमपेठ व सतरंजीपुरा झोन अंतर्गत देखील कारवाई केली. ही कारवाई सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजय कांबळे, अभियंता मालवे, जमशेद अली, संजय शिंगणे, शरद इरपाते व पथकाने केली.

अधिकारी मागताहेत दस्तावेज
 धार्मिक स्थळ तोडण्यासाठी पोहचलेल्या पथकाला विरोध करणाऱ्या नागरिकांना अधिकारी दस्तावेज मागत आहेत. १९६० पूर्वीच्या मालकी हक्काच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. कागदपत्रे सादर केली नाहीत तर कारवाई होत आहे.

घाट रोडवर शेकडो नागरिक जमले
 धंतोली झोन अंतर्गत इमामवाडा येथील घाट रोड सरदार पटेल चौकातील धार्मिक स्थळ तोडण्यात येत असल्याची माहिती मिळताच नागरिक गोळा होणे सुरू झाले. सायंकाळी ४ च्या सुमारास महापालिकेचे पथक टिंबर मार्केटच्या पटेल चौकात कारवाईसाठी पोहचताच नागरिक संतापले. नागरिकांनी नगरसेवक विजय चुटेले व सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांना घटनास्थळी बोलावले. नगरसेवकांनी पथकातील अधिकाºयांकडे उच्च न्यायालयात २ आॅगस्टची सुनावणी होईपर्यंत कारवाई थांबविण्याची मागणी केली. यानंतर महापालिकेचे अधिकारी १० आॅगस्टपर्यंतची मुदत देऊन निघून गेले. संबंधित धार्मिक स्थळ अतिक्रमित जागेवर नाही. रस्त्याच्या मध्येही. त्यामुळे ते तोडणे योग्य नाही, असे नगरसेवक चुटेले यांनी सांगितले.

 

Web Title: Tension in Ajani on demolition of a religious place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.