मनपात काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 11:44 PM2021-07-20T23:44:58+5:302021-07-20T23:45:59+5:30

congress politics in NMC काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याला दिल्लीतून पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पाठबळ मिळाल्यामुळे नागपूर महापालिकेतही स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे.

Strengthen the slogan of self-reliance of Congress in NMC | मनपात काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याला बळ

मनपात काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याला बळ

googlenewsNext
ठळक मुद्देपटोलेंच्या भूमिकेला दिल्लीत पाठबळ : नागपुरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याला दिल्लीतून पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पाठबळ मिळाल्यामुळे नागपूर महापालिकेतही स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेशी महाविकास आघाडी न करता संपूर्ण जागांवर काँग्रेस लढली, तर जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळेल. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे.

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढावे, अशी भूमिका शहर काँग्रेसने पूर्वीच घेतली आहे. महापालिकेत

राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेची आघाडी करू नये, अशा मागणीचा ठराव दीड वर्षापूर्वी शहर काँग्रेसच्या बैठकीत संमत करण्यात आला होता. पुढे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील स्वबळाचा नारा दिल्यामुळे शहर काँग्रेसच्या भूमिकेला बळ मिळाले. आता पटोले यांना दिल्लीतून पाठबळ मिळाल्यामुळे नागपूर महापालिकेत स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे.

काँग्रेसला आघाडी का नको ?

- आघाडीबाबात चर्चा करताना राष्ट्रवादी अस्वास्तव जागांची मागणी करते.

- काँग्रेस १०० टक्के जिंकेल, अशा जागांसाठी राष्ट्रवादी अडून बसते.

- या वाटाघाटीत निवडणुकीच्या काळातील महत्त्वाचा वेळ वाया जातो. फलित काहीच होत नाही.

- लोकसभेनंतरच्या प्रत्येक निवडणुकीत नागपुरात काँग्रेसची मते वाढतच गेली आहेत.

- राष्ट्रवादीची शहरात फारशी ताकद नाही. एकच नगरसेवक तोही स्वब‌ावर निवडणूक आला.

- आघाडीत शिवसेनेलाही जागा सोडाव्या लागतील. काँग्रेसच्या तेवढ्या जागा लढण्यापूर्वीच कमी होतील.

- तशीही नागपुरात शिवसेना ही भाजपची मते कमी करते. त्यामुळे सोबत लढून काँग्रेसचा फायदा नाही.

काँग्रेसला उसणवारीवर उमेदवार घ्यावे लागत नाही

 काँग्रेसच्या विचारांचे मतदार शहरातील प्रत्येक बूथवर आहेत. मित्रपक्षांसाठी ५० जागा सोडल्या तर त्या ठिकाणी पंजा चिन्ह संपेल. असे करून काँग्रेसच्या मतदाराला आपण दुसऱ्या चिन्हावर मत देण्यासाठी बाध्य करीत आहोत. काँग्रेसकडे एका वॉर्डासाठी १० ते १५ तगडे उमेदवार तिकीट मागतात. स्पर्धा एवढी असते की कुणाला तिकीट द्यावी? असा प्रश्न पडतो. आम्हाला उमेदवार उसणवारीवर घ्यावे लागत नाही. त्यामुळे पाच वर्षे पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे.

 आमदार विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Strengthen the slogan of self-reliance of Congress in NMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.