नागपुरात भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:04 AM2019-04-19T00:04:11+5:302019-04-19T00:04:40+5:30

अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले.

The speedy truck rammed youth in Nagpur | नागपुरात भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले

नागपुरात भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले

Next
ठळक मुद्देअंबाझरी बायपासवर अपघात : आरोपी ट्रकचालकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले. अंकुश शंकर पौनीकर (वय २४) असे मृताचे नाव असून, तो वाठोड्यातील रहिवासी होता.
फर्निचरचे काम करणारा अंकुश गुरुवारी सकाळी ८.३० वाजता अंबाझरी परिसरातून जात असताना अमरावतीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकचालकाने अंकुशला जोरदार धडक मारली. या अपघातामुळे अल्पावधीतच मोठी गर्दी जमली. अत्यवस्थ अवस्थेतील अंकुशची मदत करण्याऐवजी एका भामट्याने अंकुशचा मोबाईल लंपास केला. माहिती कळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून आरोपी ट्रकचालक दिलीप वरखडे (वय ५५, रा. सावरगाव, काटोल) याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: The speedy truck rammed youth in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.