स्मार्ट सिटी प्रोजेक्ट : बैठक निष्फळ, आश्वासनांची खैरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 11:56 PM2019-02-01T23:56:26+5:302019-02-01T23:57:14+5:30

पूर्व नागपुरात प्रस्तावित स्मार्ट सिटी प्रकल्पावरून नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. एकीकडे या प्रकल्पात वसलेल्या कॉलनीवरून रस्ते जात आहेत तर दुसरीकडे प्रकल्पांतर्गत ज्यांची ४० टक्के जमीन घेतली जात आहे, त्यांना कुठल्याही प्रकारची भरपाई न देता डिमांड थोपवले जात आहे. या सर्व मुद्याबाबत मनपा मुख्यालयात मनपा आयुक्त अभिजित बांगर आणि नासुप्र सभापती शीतल उगले यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय आंदोलनकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीत केवळ आश्वासन देण्यात आले. कुठल्याही प्रकारचे लिखित आश्वासन मिळाले नाही. यामुळे आंदोलनकर्ते नाराज झाले. बैठकीत पोलीस अधिकारीही उपस्थित होते.

Smart City Project: Meeting Futile, Beliefs of Assurances | स्मार्ट सिटी प्रोजेक्ट : बैठक निष्फळ, आश्वासनांची खैरात

स्मार्ट सिटी प्रोजेक्ट : बैठक निष्फळ, आश्वासनांची खैरात

Next
ठळक मुद्देनागरिकांमध्ये असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व नागपुरात प्रस्तावित स्मार्ट सिटी प्रकल्पावरून नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. एकीकडे या प्रकल्पात वसलेल्या कॉलनीवरून रस्ते जात आहेत तर दुसरीकडे प्रकल्पांतर्गत ज्यांची ४० टक्के जमीन घेतली जात आहे, त्यांना कुठल्याही प्रकारची भरपाई न देता डिमांड थोपवले जात आहे. या सर्व मुद्याबाबत मनपा मुख्यालयात मनपा आयुक्त अभिजित बांगर आणि नासुप्र सभापती शीतल उगले यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय आंदोलनकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीत केवळ आश्वासन देण्यात आले. कुठल्याही प्रकारचे लिखित आश्वासन मिळाले नाही. यामुळे आंदोलनकर्ते नाराज झाले. बैठकीत पोलीस अधिकारीही उपस्थित होते.
विशेष म्हणजे २ फेब्रुवारी नागपूर सेफ अ‍ॅण्ड स्मार्ट सिटी प्रकल्पाचे लोकार्पणसह स्मार्ट सिटी अभियान व अमृत अभियान अंतर्गत पाणीपूरवठा योजनेचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीत पोलीस व प्रशासन आहेत. या दरम्यान स्मार्ट सिटीच्या प्रारुपाविरुद्ध लोकांमध्ये असंतोष जाहीर करणे, पारडी चौकात आंदोलन आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावून आश्वासन देणे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.
आंदोलनकर्ते व नागरिकांचा आरोप आहे की, स्मार्ट सिटी प्रकल्पात अनेक त्रुटी आहेत. हा प्रकल्प लोकांवर थोपविला जात आहे. यात अनेक लोक बेघर होतील. नुकसान भरपाईची पद्धतही पूर्णत: चुकीची आहे. ज्यांची ४० टक्के जमीन घेतली जात आहे, त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही. त्यानंतर उरलेल्या ६० टक्के जागेवर डिमांड जारी करणे, हा कुठला न्याय आहे. बैठक निष्फळ ठरल्यानंतर आंदोलनकर्त्यांचा असंतोष आणखी वाढला आहे.

Web Title: Smart City Project: Meeting Futile, Beliefs of Assurances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.