लग्नास नकार दिल्याने शबनमची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:27 AM2018-06-14T00:27:47+5:302018-06-14T00:28:02+5:30

लग्न करण्यास नकार दिल्यामुळे शबनम खानची हत्या करण्यात आली. शबनमची हत्या करणारा आरोपी स्कूल बस चालक सोनू शेख याने ही बाब कबूल केली.

Shabnam's assassination for denied the marriage | लग्नास नकार दिल्याने शबनमची हत्या

लग्नास नकार दिल्याने शबनमची हत्या

Next
ठळक मुद्देआरोपी मित्राला अटक : १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : लग्न करण्यास नकार दिल्यामुळे शबनम खानची हत्या करण्यात आली. शबनमची हत्या करणारा आरोपी स्कूल बस चालक सोनू शेख याने ही बाब कबूल केली.
गिट्टीखदान पोलिसांनी सोनूला त्याच्या गोंदिया येथील काकाच्या घरून अटक केली. त्याने ११ जून रोजी रात्री ८.३० वाजता काटोल रोडवरील दाभा स्थित जगदीशनगर येथे २३ वर्षीय शबनमची हत्या केली होती. पोलिसांना १२ जून रोजी दुपारी याबाबत माहिती मिळाली. मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर सोनुच्या नातेवाईकांनी तिची सोनूसोबत मैत्री असल्याचे सांगितले होते. घटनास्थळापासून थोड्यात अंतरावर सोनूचे घर असल्याने पोलीस त्याच्या घरी गेले. परंतु तो अगोदरच फरार झाला होता.
सूत्रानुसार सोनूची गेल्या सहा महिन्यांपासून शबनमसोबत मैत्री आहे. सोनूचे म्हणणे आहे की, तो शबनमवर प्रेम करु लागला होता. त्याने शबनमकडे लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. परंतु शबनमने नकार दिला होता. सोनू लग्न करण्यास योग्य नसल्याचे तिला वाटत होते. त्यमुळे तिने लग्नास नकार दिला होता. यावरून दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरु होता. शबनमने याबाब आपल्या बहिणीलाही सांगितले होते. शबनमने लग्नास नकार दिल्यापासून सोनू अतिशय रागात होता. तो शबनमला अद्दल घडविण्याच्या तयारीत होता. ११ जून रोजीे रात्री ७.३० वाजता नेहमीप्रमाणे शबनम ड्युटीवर जाण्यासाठी घरून निघाली. ती गिट्टीखदान येथील एका क्लिनीकमध्ये काम करीत होती. सोनूला याची माहिती होती. सोनू तिला बोलण्याच्या बहाण्याने बाईकवर बसवून घटनास्थळी घेऊन आला. तिथे पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. सोनूच्या म्हणण्याुसर शबनम त्याला शिवीगाळ करू लागली. यामुळे त्याला प्रचंड राग आला आणि रागाच्या भरात त्याने तिच्याच्या ओढणीने तिचा गळा आवळला. ती जिवंत असेल या शंकेने पोटात चाकू खुपसून फरार झाला.
सोनू हा बस चालक आहे. या प्रकरणात त्याच्यासोबत आणखी कुणीही नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. एपीआय एस.एस. गजा यंनी सोनुला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले. तेथून त्याला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात आले.
खरे कारण लपविले जात असल्याचा संशय
सोनू हत्या केल्याची कबुली देत असला तरी तो खरे कारण लपवित असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस शबमच्या कुटुंबीयांचीही विचारपूस करणार आहे. शबनमचे वडील रिक्षा चालवतात. घर चालवण्यासाठी शबनमच्या बहिणीही काम करतात. याबाबत सोनूला माहिती असल्याने तो चुकीच्या कामासाठी शबनमला त्रास तर देत असल्याची शंका नाकारता येत नाही.

 

Web Title: Shabnam's assassination for denied the marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.