थकबाकीदारांच्या जप्त संपत्तीची विक्री : मनपाची प्रथमच कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 10:15 PM2019-03-28T22:15:48+5:302019-03-28T22:17:39+5:30

शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊ नही थकीत कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या जप्त संपत्तीची विक्री सुरू केली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच थकबाकीदारांच्या संपत्तीचा जाहीर लिलाव करून विक्री करण्यात आली आहे. हनुमाननगर झोनमधील थकबाकीदाराच्या विक्री केलेल्या संपत्तीचे विक्री प्रमाणपत्र गुरुवारी दुय्यम सहनिबंधक यांच्या कार्यालयात खरेदीदाराला प्रदान करण्यात आले.

Sale of the seized assets of the defaulters: First action of the Municipal Corporation | थकबाकीदारांच्या जप्त संपत्तीची विक्री : मनपाची प्रथमच कारवाई

थकबाकीदारांच्या जप्त संपत्तीची विक्री : मनपाची प्रथमच कारवाई

Next
ठळक मुद्दे१२० स्थावर मालमत्ता होणार नावे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊ नही थकीत कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या जप्त संपत्तीची विक्री सुरू केली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच थकबाकीदारांच्या संपत्तीचा जाहीर लिलाव करून विक्री करण्यात आली आहे. हनुमाननगर झोनमधील थकबाकीदाराच्या विक्री केलेल्या संपत्तीचे विक्री प्रमाणपत्र गुरुवारी दुय्यम सहनिबंधक यांच्या कार्यालयात खरेदीदाराला प्रदान करण्यात आले.
मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया करण्यात आली. उपायुक्त राजेश मोहिते यांच्या हस्ते खरेदीदाराला विक्री प्रमाणपत्र देण्यात आले. सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, हनुमान नगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, सहायक अधीक्षक विकास रायबोले, राजस्व निरीक्षक गौरीशंकर रहाटे, रामदास चरपे आदी उपस्थित होते.
मागील अनेक वर्षांपासून शहरातील मालमत्ताधारकांकडील थकीत कर वसुलीसाठी महापालिकेने विविध प्रकारची कारवाई केली. थकबाकीदारांना वॉरंटही बजावले, जप्तीची कारवाईही करण्यात आली होती. मात्र यानंतरही थकबाकीदारांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे संपत्तीचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
थकबाकीदारांची मालमत्ता वृत्तपत्रात प्रसिद्ध करून जाहीर लिलाव करण्यात आला. लिलावातील महत्तम बोलीला संपत्तीची विक्री करण्यात आली. या प्रक्रियेला एक वर्षाहून अधिक कालावधी लागला.
थकबाकीदारांच्या तीन मालमत्ताची जाहीर लिलावाद्वारे विक्री केली आहे. गुरुवारी हनुमान नगर झोनमधील एका खरेदीदाराला विक्री प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शुक्रवारी दोन खरेदीदारांना विक्री प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, जाहीर लिलाव प्रक्रियेमध्ये खरेदीदार उपलब्ध न झालेल्या संपूर्ण शहरातील १२० स्थावर मालमत्ता महापालिकेच्या नावावर करण्यात येणार आहे. खरेदीदार उपलब्ध न झालेल्या या स्थावर मालमत्ता नाममात्र शुल्कावर लवकरच मनपा आयुक्तांच्या नावे करण्यात येणार आहे.
महापालिकेतर्फे ही कारवाई नियमित सुरू राहणार आहे. अनेक वर्षांपासून मालमत्ता कर थकबाकीदारांना यामार्फत शेवटची संधी दिली जाणार आहे. थकीत कराचा भरणा तातडीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Sale of the seized assets of the defaulters: First action of the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.