नागपुरात वाऱ्यासह अनेक भागात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:59 PM2019-04-12T23:59:25+5:302019-04-13T00:00:19+5:30

शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे शहरातील तापमान गेल्या २४ तासात १.७ डिग्री सेल्सियसपर्यंत खाली आले होते. गर्मी मात्र कायम होती. दिवसभर उनसावल्यांचा खेळही बघायला मिळाला. रात्री ८ वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाºयासह अनेक भागामध्ये पाऊससुद्धा झाला. शुक्रवारी नागपूरचे तापमान ४१.८ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. रात्रीचे तापमान २३.७ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले. गेल्या २४ तासात नागपुरात ४.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Rain in many parts of Nagpur with wind | नागपुरात वाऱ्यासह अनेक भागात पाऊस

नागपुरात वाऱ्यासह अनेक भागात पाऊस

Next
ठळक मुद्देदिवसभर चालला ऊन सावल्यांचा खेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे शहरातील तापमान गेल्या २४ तासात १.७ डिग्री सेल्सियसपर्यंत खाली आले होते. गर्मी मात्र कायम होती. दिवसभर उनसावल्यांचा खेळही बघायला मिळाला. रात्री ८ वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाºयासह अनेक भागामध्ये पाऊससुद्धा झाला. शुक्रवारी नागपूरचे तापमान ४१.८ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. रात्रीचे तापमान २३.७ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले. गेल्या २४ तासात नागपुरात ४.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आठवडाभर शहरात अशाच प्रकारचे वातावरण राहणार आहे. आकाशात ढगाळ वातावरण असले तरी तापमान ४० डिग्रीवर राहील. दुपारी उकाडाही जाणवेल. पाऊसही येऊ शकतो. विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्ये तापमान कायम होते. ब्रह्मपुरी ४४.२ डिग्रीने सर्वाधिक उष्ण राहिले. चंद्रपुरात ४४, अकोला ४३.९, अमरावती ४३.६, वर्धा ४३.३, यवतमाळ ४२.५, गडचिरोली व वाशीममध्ये ४२, बुलडाणा ४१, गोंदिया ४०.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

Web Title: Rain in many parts of Nagpur with wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.