नितीन गडकरी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री : विदर्भाच्या विकासाला मिळणार नवा ‘बूस्टर डोज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 08:44 PM2019-05-30T20:44:53+5:302019-05-30T21:47:35+5:30

देशाच्या राजकारणात एक कर्तृत्ववान नेते व ‘व्हिजन’ असलेले राजकारणी अशी ओळख असलेले नितीन गडकरी यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. २०१४ पासून भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा व गंगा पुनरुत्थान मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी आपल्या कार्यशैलीने विरोधकांनादेखील प्रभावित केले होते. नवीन जबाबदारी सांभाळत असताना देशासह विदर्भाच्या विकासाला नवा ‘बूस्टर डोज’ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Nitin Gadkari continue Union Minister for the second time: Vidarbha's development will get new booster dosage | नितीन गडकरी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री : विदर्भाच्या विकासाला मिळणार नवा ‘बूस्टर डोज’

नितीन गडकरी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री : विदर्भाच्या विकासाला मिळणार नवा ‘बूस्टर डोज’

Next
ठळक मुद्देधडाकेबाज कामाची कार्यशैली कायम राहणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाच्या राजकारणात एक कर्तृत्ववान नेते व ‘व्हिजन’ असलेले राजकारणी अशी ओळख असलेले नितीन गडकरी यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. २०१४ पासून भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा व गंगा पुनरुत्थान मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी आपल्या कार्यशैलीने विरोधकांनादेखील प्रभावित केले होते. नवीन जबाबदारी सांभाळत असताना देशासह विदर्भाच्या विकासाला नवा ‘बूस्टर डोज’ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. 


२०१४ साली मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतरच नितीन गडकरी यांनी देशभरात कामाचा धडाका लावला होता. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गांचे रुप पालटले व देशात लाखो किलोमीटर लांबीच्या महामार्गांच्या कामाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे ईशान्येकडील राज्यांमधील महामार्गांचे जाळे विस्तारले. दुसरीकडे गडकरी यांच्या प्रयत्नांतून देशातील जलवाहतुकीलादेखील नवीन संजीवनी मिळाली. अनेक वर्षे अडगळीत पडलेला वाराणसी ते हल्दिया हा १३९० किलोमीटर लांबीचा जलमार्ग प्रकल्प गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात उतरला. शिवाय वाराणसी येथे मल्टीमॉडेल हब स्थापन करुन एक इतिहासच रचला. गंगा नदीच्या स्वच्छतेलादेखील गती आली आहे आणि नदीकाठच्या काही मोठ्या शहरातील सांडपाण्यावर प्रक्रियेचे प्रकल्पदेखील कार्यान्वित झाले आहेत. गडकरी यांची कार्यशैली लक्षात घेता नवीन जबाबदाऱ्यादेखील ते त्याच तत्परतेने सांभाळतील व देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र-विदर्भाला मोठ्या आशा
दिल्लीत काम करत असताना गडकरी यांनी महाराष्ट्र व विदर्भाकडे नेहमीच लक्ष ठेवले. यांच्या पुढाकारातून राज्यात प्रत्यक्षात हजारो किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे काम झाले आहे. याशिवाय ६५ मार्गांवर हजारो कोटींची कामे सुरूदेखील आहेत. १४ महामार्गांचे चौपदरीकरण अंतिम टप्प्यात आले आहे.
नागपूर घेणार ‘ग्लोबल’ झेप
गडकरी प्रतिनिधित्व करीत असलेल्या नागपूरचा मागील पाच वर्षांत कायापालट झाला. ‘मेट्रो’ सुरू झाली. शिवाय ‘आयआयएम’, ‘एम्स’ यासारख्या राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक संस्थादेखील सुरू झाल्या. मोठ्या आयटी कंपन्यांचेदेखील काम सुरू झाले असून पुढील पाच वर्षात शहरात गुंतवणुकीचा ओघ वाढून नागपूर ‘ग्लोबल’ झेप घेणार हे खुद्द गडकरी यांनीच सांगितले आहे.
स्वयंसेवक ते केंद्रीय मंत्री
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले गडकरी यांनी महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून काम केले. १९८९ मध्ये नागपूर पदवीधर विधानसभा मतदार संघातून त्यांना भाजपाने उमेदवारी दिली. सातत्याने १९८९, १९९६, २००२ मध्ये त्यांनी निवडणुका जिंकल्या. १९९५ साली राज्यात युतीचे शासन आल्यानंतर त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचा पदभार सोपविण्यात आला होता आणि त्यांनी मुंबईसह राज्यात १०० हून अधिक उड्डाण पुलांची मालिकाच उभारली. विकासपुरुष, ‘रोडकरी’, ‘पुलकरी’, ही बिरुदे त्यांना या काळात चिकटली. २००९ साली गडकरी यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जाहीर करण्यात आले. गडकरी यांनी पक्षाला नवी ऊर्जा दिली व ‘व्हिजन-२०२५’मुळे पक्षात नवा जोश संचारला. ‘मूठभर लोकांचा संकुचित आणि मर्यादित पक्ष’ ही भाजपाची प्रतिमा त्यांनी बदलली. २०१४ साली भाजपाचे सरकार सत्तेत आले व केंद्रात त्यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली
स्वयंसेवक ते केंद्रीय मंत्री
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले गडकरी यांनी महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून काम केले. १९८९ मध्ये नागपूर पदवीधर विधानसभा मतदार संघातून त्यांना भाजपाने उमेदवारी दिली. सातत्याने १९८९, १९९६, २००२ मध्ये त्यांनी निवडणुका जिंकल्या. १९९५ साली राज्यात युतीचे शासन आल्यानंतर त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचा पदभार सोपविण्यात आला होता आणि त्यांनी मुंबईसह राज्यात १०० हून अधिक उड्डाण पुलांची मालिकाच उभारली. विकासपुरुष, ‘रोडकरी’, ‘पुलकरी’, ही बिरुदे त्यांना या काळात चिकटली. २००९ साली गडकरी यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जाहीर करण्यात आले. गडकरी यांनी पक्षाला नवी ऊर्जा दिली व ‘व्हिजन-२०२५’मुळे पक्षात नवा जोश संचारला. ‘मूठभर लोकांचा संकुचित आणि मर्यादित पक्ष’ ही भाजपाची प्रतिमा त्यांनी बदलली. २०१४ साली भाजपाचे सरकार सत्तेत आले व केंद्रात त्यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली.

Web Title: Nitin Gadkari continue Union Minister for the second time: Vidarbha's development will get new booster dosage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.