तोकडे कपडे घालून देवदर्शनाला आलात, तर...; महाराष्ट्र मंदिर महासंघाने शोधला मध्यममार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 06:38 PM2023-05-26T18:38:25+5:302023-05-26T18:38:45+5:30

आजपासून नागपूर येथील चार मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे.

Maharashtra Temple Federation has decided to implement dress code in 4 temples in Nagpur  | तोकडे कपडे घालून देवदर्शनाला आलात, तर...; महाराष्ट्र मंदिर महासंघाने शोधला मध्यममार्ग

तोकडे कपडे घालून देवदर्शनाला आलात, तर...; महाराष्ट्र मंदिर महासंघाने शोधला मध्यममार्ग

googlenewsNext

नागपूर : आजपासून नागपूर येथील चार मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे. पहिल्या महिन्यात राज्यभरातील ३०० पेक्षा जास्त मंदिरांमध्ये हा नियम लागू करावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मंदिर महासंघाने दिली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी तोकडे, अंगप्रदर्शन करणारी अथवा उत्तेजक कपडे परिधान केल्यास त्यांना दर्शन घेता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मंदिर महासंघाने पत्रकार परिषदेतून मांडली. 

अंगप्रदर्शन करणारी वस्त्रे घालणाऱ्यांना प्रवेश देऊन नये, असा निर्णय नागपूर येथील चार मंदिराच्या विश्वस्तांनी घेतला आहे. खरं तर या आधी तुळजापूर मंदिर समितीने देखील असा निर्णय घेतला होता. पण काही तासांतच समितीला हा निर्णय मागे घ्यावा लागला. पण नागपूरच्या चार मंदिरामध्ये आजपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. पाश्चिमात्य कपडे असतील तर त्याला सरसकट विरोध नाही. तसेच पॅंट शर्ट घालून आलेल्यांना देखील विरोध नसेल पण फॅशन करणाऱ्यांना प्रवेश नाकारला जाईल असं महासंघाने स्पष्ट केलं. 

 नागपुरातील ४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू 
नागपुरातील चार मंदिरांमध्ये आजपासून वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यामध्ये गोपाळ कृष्ण मंदिर, धनतोली, संकटमोचन पंचमुख हनुमान मंदिर, बेलोरी, बृहस्पती मंदिर, कोन्होलीबारा आणि दुर्गामाता मंदिर हिलटॉप या मंदिरांचा समावेश आहे. लक्षणीय बाब म्हणजे जे भाविक अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान करून येतील त्यांना मंदिर समितीकडून ओढणी अथवा अंग झाकता येईल, असं वस्त्र दिलं जाईल. महाराष्ट्र सरकारच्या कार्यालयात वस्त्रसहिता आहे, तर मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी का नाही असा प्रश्न देखील महाराष्ट्र मंदिर महासंघाने उपस्थित केला. 

नागपुरातील चार मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू केल्यानंतर समितीने भाविकांसाठी पोस्टर लावले आहे. "अंगप्रदर्शक, उत्तेजक, असभ्य, अशोभनीय व तोकडे वस्त्र तसेच असात्विक वेशभूषा करून मंदिरात प्रवेश करू नये. भारतीय संस्कृतीचे पालन करून सात्विक वेशभूषेतच दर्शन घ्यावे", अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहे. 

 

Web Title: Maharashtra Temple Federation has decided to implement dress code in 4 temples in Nagpur 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.