ठळक मुद्देशेतकरी संतप्त : दारव्हा तालुक्यात शासकीय कापूस खरेदीचा मुहूर्तच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुक्यातील दोन्ही ठिकाणी उद्यापर्यंत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकºयांना आपला कापूस खुल्या बाजारात विकावा लागत आहे. आता संपूर्ण कापूस व्यापाºयांकडे गेल्यानंतर ही केंद्रे सुरु करणार का असा संतप्त सवाल शेतकºयांनी उपस्थित केला आहे.
ही केंद्रे सुरू करण्याबाबत पणन महासंघाकडे संपर्क साधला तर दारव्हा सीसीआयकडे असल्याचे सांगण्यात येते तर सीसीआयचे अधिकारी स्टाफ नसल्याचे कारण पुढे करतात. या दोन्ही एजंसीकडून अशा प्रकारे टोलवाटोलवी सुरू असून यात शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने चालू हंगामातील शेतमालाची किमान आधारभूत किंमत जाहीर केल्यानंतर या किंमतीने माल विकण्याकरतिा मोठ्या प्रमाणात जाहीरातबाजी करून मालाची आॅन लाईन नोंदणी करण्याचे आवाह केले होते. त्यानुसार शेतकरी नोंदणीसाठी गर्दी करीत आहे.दारव्हा तालुक्यात दारव्हा व बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेंटरवर यापूर्वी ही खरेदी केली जात होती मात्र यावर्षी हे दोनही सेंटर सुरु झाले नाही.
यासंदर्भात राज्य कापुस उत्पादक पणन महासंघाच्या यवतमाळ येथील कार्यालयात विचारणा केली असता दारव्हा सेंटर सीसीआयकडे असल्याचे सांगून त्यांनी हात झटकले आणि सीसीआयचे अधिकारी त्यांच्याकडे पुरेसा स्टाफ नाही असे सांगतात. त्यांनी पूर्वीच अधिकारी, कर्मचारी इतर राज्यातील सेंटरवर पाठविल्याचे समजते. त्यामुळे दारव्हा तालुक्यातील कापुस केंद्र की राज्य सरकारच्या एजंसीने खरेदी करावा असा पेच निर्माण झाला आहे. इकडे शासकीय खरेदी केंद्र उघडण्यास मोठव विलंब होत असल्यामुळे शेतकºयांसमोर अडचण निर्माण झाली आहे. नाईलाजास्तर शेतकरी खाजगी व्यापाºयाकडे कापुस विक्रीला आणत आहे. व्यापारी अशावेळी मनमानी भावाने शेतकºयांकडून कापसाची खरेदी करतात.
काही दिवसांपासून कापसाची आवक वाढल्याने खुल्या बाजारात तेजी असून व्यापारी वर्गाची चांगली मौज आहे. शेतकºयांचे मात्र नुकसान होत आहे. यामुळे तात्काळ शासकीय कापुस खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी आहे.
कापसाची आॅनलाईन नोंदणी नाही
शासनातर्फे एकीकडे शेतमाल विक्रीकरिता आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र बाजार समितीने अद्याप नोंदणी सुरु केली नाही. बाजार समिती प्रशासनाने सीसीआयच्या अधिकाºयांकडे नोंदणी संदर्भात विचारणा केली असता त्यांना नोंदणी करून घ्या मात्र शेतकºयांना कापूस विकायला आर्णीच्या केंद्रावर पाठवा असे सांगण्यात आले.त्यामुळे ही नोंदणी सुरु झाली नाही.