गळती व दुरुस्तीच्या कामासाठी शेकडो वस्त्या पाण्यापासून राहणार वंचित

By मंगेश व्यवहारे | Published: May 8, 2024 01:42 PM2024-05-08T13:42:47+5:302024-05-08T13:44:40+5:30

Nagpur : फीडरवरून पाणीपुरवठा होणाऱ्या वस्त्यांमध्ये ९ मे रोजी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही

Hundreds of villages will be deprived of water due to leakage and repair work | गळती व दुरुस्तीच्या कामासाठी शेकडो वस्त्या पाण्यापासून राहणार वंचित

Hundreds of villages will be deprived of water due to leakage and repair work

नागपूर : खैरी पुलाजवळील ६०० एमएम व्यासाच्या बस्तरवारी फीडरवर गळती व दुरुस्तीचे काम ओसीडब्ल्यू व महापालिकेने हाती घेतले आहे. त्यासाठी ८ मे रोजी रात्री ९:३० ते ९ मे रोजी सकाळी ९:३० पर्यंत शटडाऊन करण्यात येणार आहे. त्यामुळे या फीडरवरून पाणीपुरवठा होणाऱ्या वस्त्यांमध्ये ९ मे रोजी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्याचा फटका शेकडो वस्त्यांना बसणार आहे. 

- या वस्त्यांमध्ये राहणार पाणीपुरवठा खंडित
नयापुरा, लोधीपुरा, गोंधपुरा, श्रीराम सोसायटी, पौनीकर सायकल स्टोअर, नागा शिवमंदिर, मातामंदिर, रामदल आखाडा, श्रीवास्तव विहीर, बाहुली विहीर, देवघरपुरा, पहाडपुरा, लालगंज, बस्तरवारी माता मंदिर, तेलघाणी, कुंभारपुरा, राऊत चौक, तेलीपुरा, पेवठा, चकना चौक, छत्तीसगडी राम मंदिर, नाईक तलाव, बांग्लादेश पोलिस चौकी, बैरागीपुरा, तांडापेठ नवीन बस्ती, मोचीपुरा, रामनगर, बारईपुरा, बंगालीपंजा, मुसलमानपुरा, ठक्कर ग्राम, खाटीकपुरा, लाडपुरा, कुंभारपुरा, कुंदनलाल गुप्तानगर, कोलबास्वामीनगर, तिनखडे लेआऊट, वृंदावननगर, मेहेंदीबाग कॉलनी, बिनाकी मंगळवारी, जोशीपुरा, गोसावी घाट, पोळा मैदान, बिनाकी मंगळवारी, भोळेनगर, आनंदनगर, नामदेवनगर, अनुसयामाता नगर आदीं वस्त्यांमधील पाणीपुरवठा बंद राहील.

Web Title: Hundreds of villages will be deprived of water due to leakage and repair work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.