देवेंद्र फडणवीस व अजित पवारांच्या नेतृत्वात राज्याचा विकास होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 03:01 PM2019-11-23T15:01:54+5:302019-11-23T15:02:20+5:30

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्याचा विकास निश्चित होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केला आहे.

The development of the state will be led by Devendra Fadnavis and Ajit Pawar | देवेंद्र फडणवीस व अजित पवारांच्या नेतृत्वात राज्याचा विकास होईल

देवेंद्र फडणवीस व अजित पवारांच्या नेतृत्वात राज्याचा विकास होईल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्याचा विकास निश्चित होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केला आहे. नागपुरात आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या पत्रपरिषदेत ते बोलत होते.
राजकारण व क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं, असं मी गेल्याच आठवड्यात बोललो होतो, ते खरं ठरलं, असं स्मरण देत त्यांनी राज्यातील चालू राजकीय घडामोडींवर कोपरखळी मारली. राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत फडणवीस व पवार आपले बहुमत सिद्ध करतील व त्यांच्या नेतृत्वात राज्याला स्थिर सरकार मिळेल असे ते पुढे म्हणाले व त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या व्यतिरिक्त अधिक भाष्य करणे या ठिकाणी उचित होणार नाही, असे सांगून त्यांनी राजकीय विषयाला विराम दिला.

Web Title: The development of the state will be led by Devendra Fadnavis and Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.