केएफडब्ल्यूचे मेट्रो प्रकल्पाला ५०० दशलक्ष युरोचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:24 AM2018-08-01T00:24:03+5:302018-08-01T00:25:37+5:30

भारताच्या फ्लॅगशीप कार्यक्रम ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘स्कील इंडिया’मध्ये जर्मनी गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचे मत जर्मनीच्या डेप्युटी चीफ आॅफ मिशनचे डॉ. जस्पर विक यांनी व्यक्त केले. विक हे भारतातील जर्मनीच्या दूतावासाचे आर्थिक व ग्लोबल अफेयरचे प्रमुख आहेत.

Debt of 500 million euros from KFW to Metro Project | केएफडब्ल्यूचे मेट्रो प्रकल्पाला ५०० दशलक्ष युरोचे कर्ज

केएफडब्ल्यूचे मेट्रो प्रकल्पाला ५०० दशलक्ष युरोचे कर्ज

Next
ठळक मुद्देडॉ. जास्पर वीकने केली मेट्रो प्रकल्पाची आकस्मिक पाहणी

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारताच्या फ्लॅगशीप कार्यक्रम ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘स्कील इंडिया’मध्ये जर्मनी गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचे मत जर्मनीच्या डेप्युटी चीफ आॅफ मिशनचे डॉ. जस्पर विक यांनी व्यक्त केले. विक हे भारतातील जर्मनीच्या दूतावासाचे आर्थिक व ग्लोबल अफेयरचे प्रमुख आहेत.
डॉ. विक यांनी जर्मनीच्या केएफडब्ल्यूच्या शिष्टमंडळासोबत महामेट्रोच्यानागपूरमेट्रो रेल्वे प्रकल्पाची पाहणी केली आणि वेगाने विकास होणाऱ्या नागपूर मेट्रोच्या प्रकल्पाची प्रशंसा केली. महामेट्रो प्रकल्प इंडो-जर्मन आर्थिक सहयोगाचा दीपस्तंभ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी राजकीय विभागाच्या मरियन स्ट्रोबेल आणि केएफडब्ल्यूचे उपसंचालक अनिरबन कुनडू उपस्थित होते.
पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. विक म्हणाले, नागपूर मेट्रो प्रकल्पाचे कार्य अतिशय योग्य पद्धतीने पूर्ण होत असून यात प्रामुख्याने सौर ऊर्जेचा वापर होत असल्याने ते पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. तसेच प्रकल्पांतर्गत प्रस्तावित फिडर सर्व्हिसमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होईल. प्रकल्पातील वैशिष्ट्यांमुळे महामेट्रोची सेवा नागपूरकरांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.
विक म्हणाले, जर्मनी कोचीमध्ये निर्मित वॉटर ट्रान्सपोर्ट आणि मेट्रोच्या कामासह राज्यात सोलर प्रकल्पातही गुंतवणूक करीत आहे. गंगा स्वच्छतेच्या प्रकल्पात काम करीत आहे. जर्मनी भारताला दरवर्षी एक अब्ज युरोचे कर्ज देत आहे. त्यांनी भारतातील संशोधन आणि विकास कामांची प्रशंसा केली.
केएफडब्ल्यूच्या शिष्टमंडळाने सर्वप्रथम मेट्रो अधिकाऱ्यांसोबत प्रकल्पाविषयी चर्चा केली. एक तास चाललेल्या बैठकीत जर्मनीच्या अधिकाऱ्यांसमोर प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यात मेट्रो प्रकल्पाचा विस्तार, प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि आगामी काळातील नियोजनाची माहिती देण्यात आली. यानंतर जर्मनीच्या अधिकाऱ्यांनी मेट्रो राईडचा आनंद अनुभवला. एअरपोर्ट साऊथ ते खापरी आणि परतीचा प्रवास त्यांनी मेट्रोतून केला. खापरी मेट्रो स्टेशन आणि तेथील सोईसुविधांची पाहणी जर्मनीच्या शिष्टमंडळाने केली.
जर्मनीची केएफडब्ल्यू वित्त कंपनी महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाला ५०० दशलक्ष युरोचे कर्ज देत आहे. कंपनीने आतापर्यंत सुमारे २० टक्के कर्ज महामेट्रोला दिले आहे.
दौऱ्यात महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक अ‍ॅण्ड सिस्टीम) सुनील माथूर, संचालक (वित्त) एस. शिवमाथन, कार्यकारी संचालक (एसपी) एस रामनाथ, कार्यकारी संचालक (रोलिंग स्टॉक अ‍ॅण्ड सिस्टीम) जनककुमार गर्ग, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे आणि महामेट्रोचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Debt of 500 million euros from KFW to Metro Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.