Nagpur | भाजप शिवसेनेपेक्षा शहरात १५ पट, तर ग्रामीणमध्ये तिप्पट मजबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 01:26 PM2022-07-09T13:26:38+5:302022-07-09T13:29:23+5:30

नागपूर शहरात भाजप शिवसेनेच्या तब्बल १५ पट, तर ग्रामीणमध्ये तिप्पट शक्तिशाली असल्याचे स्पष्ट झाले.

BJP is 15 times stronger in urban areas than Shiv Sena, and three times stronger in rural areas of nagpur | Nagpur | भाजप शिवसेनेपेक्षा शहरात १५ पट, तर ग्रामीणमध्ये तिप्पट मजबूत

Nagpur | भाजप शिवसेनेपेक्षा शहरात १५ पट, तर ग्रामीणमध्ये तिप्पट मजबूत

Next
ठळक मुद्दे२०१४ च्या विधानसभेत शिवसेनेची पोलखोल : सहा मतदारसंघांत तर १० हजारांखाली मते

कमलेश वानखेडे

नागपूर : भाजप-शिवसेनेची युती २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तुटली. दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यावेळी खऱ्या अर्थाने झालेल्या शक्ती परीक्षेत शिवसेना सपशेल फेल ठरली. त्या निकालाच्या आकडेवारीवरून नागपूर शहरात भाजप शिवसेनेच्या तब्बल १५ पट, तर ग्रामीणमध्ये तिप्पट शक्तिशाली असल्याचे स्पष्ट झाले.

२०१४ च्या विधानसभेत नागपूर शहरात शिवसेनेचे पितळ उघडे पडळे. भाजपला शहरात एकूण ४ लाख ६८ हजार ३०१ मते मिळाली. शिवसेनेने सहापैकी पाच विधानसभेत उमेदवार दिले होते. त्यांना एकूण फक्त २८ हजार ५८० मते मिळाली. उत्तर नागपुरात उमेदवारच मिळाला नाही. दक्षिण नागपुरातून लढलेले किरण पांडव यांना १३ हजार ८६३ मते मिळाली होती. इतर उमेदवार १० हजार मतांचा टप्पाही ओलांडू शकले नाहीत. पश्चिम, दक्षिण-पश्चिम व मध्य नागपुरात तर पाच हजारांखाली मते मिळाली. शिवसेनेची मते पाहून सहसा पुन्हा कुणी लढण्याचे धाडस करणार नाही, अशी स्थिती आहे.

नागपूर ग्रामीणमध्ये भाजप सावनेर वगळता उर्वरित पाच मतदारसंघांत लढला होता. भाजपला एकूण ४ लाख ३२ हजार ९८० मते मिळाली, तर शिवसेनेला १ लाख ६३ हजार मते मिळाली. रामटेकमध्ये आशिष जयस्वाल यांचा पराभव झाला; पण त्यांना ४७ हजार २६२ मते मिळाली होती. हिंगणा व उमरेड मतदारसंघांत शिवसेना १० हजारांच्या आत, तर काटोल व कामठी मतदारसंघात १५ हजारांच्या आतच निपटली.

सावनेरमध्ये भाजपने दिली सेनेला साथ

- २०१४ मध्ये सावनेर मतदारसंघात भाजपकडून सोनबा मुसळे यांना उमेदवारी मिळाली होती, तर शिवसेनेने विनोद जीवतोडे यांना उमेदवारी दिली. मुसळे यांच्या निवडणूक अर्जावर आक्षेप घेण्यात आला व त्यांची उमेदवारी रद्द झाली. कमळ चिन्हच नसल्यामुळे काँग्रेसकडून रिंगणात असलेले सुनील केदार यांना रोखण्यासाठी भाजपच्या बहुतांश कार्यकर्त्यांनी जीवतोडे यांच्या धनुष्यबाणावर मतदान केले. त्यामुळे शिवसेनेला येथे तब्बल ७५ हजार ४२१ मते मिळाली. आता या मतांमध्ये शिवसेनेचा खरा वाटा किती, हा संशोधनाचा विषय आहे.

२०१४ मध्ये शिवसेनेला मिळालेली मते

मतदारसंघ -उमेदवार - एकूण मते

पूर्व नागपूर -अजय दलाल ७४८१

पश्चिम नागपूर -विकास अंभोरे ११८०

उत्तर नागपूर -- --

दक्षिण नागपूर -किरण पांडव १३८६३

दक्षिण-पश्चिम -पंजू तोतवानी २७६७

मध्य नागपूर -सतीश हरडे ३२८९

काटोल -राजेंद्र हरणे १३६४९

सावनेर -विनोद जीवतोडे ७५४२१

हिंगणा -प्रकाश जाधव ६९९७

उमरेड -जगन्नाथ अभ्यंकर ७१८०

कामठी - तापेश्वर वैद्य १२७९१

रामटेक - आशिष जयस्वाल -४७२६२

Web Title: BJP is 15 times stronger in urban areas than Shiv Sena, and three times stronger in rural areas of nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.