रेल्वे आपलीच संपत्ती, कशाला घ्यायचे तिकिट? एका महिन्यात २.५ लाख फुकट्यांचा रेल्वेने प्रवास

By नरेश डोंगरे | Published: September 12, 2023 02:48 AM2023-09-12T02:48:03+5:302023-09-12T02:49:02+5:30

त्यांच्याकडून दंडापोटी १२ कोटी रुपयेही वसूल केले.

2.5 lakh free train travel in a month nagpur | रेल्वे आपलीच संपत्ती, कशाला घ्यायचे तिकिट? एका महिन्यात २.५ लाख फुकट्यांचा रेल्वेने प्रवास

प्रतिकात्मक फोटो

googlenewsNext

नागपूर : विश्वास करा अथवा नका करू, मात्र हे वास्तव आहे. गेल्या महिन्यात अवघ्या ३१ दिवसांत रेल्वेने बिनबोभाट प्रवास करताना चक्क २ लाख, ५ हजार फुकटे प्रवासी आढळले. होय, या फुकट्यांना मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीच विविध रेल्वेस्थानकांवर पकडले. त्यांच्याकडून दंडापोटी १२ कोटी रुपयेही वसूल केले.

रेल्वे आपलीच संपत्ती आहे. तिचा योग्य प्रकारे वापर करा, असे रेल्वे बोर्डाचे स्लोगन आहे. त्याचा अर्थ फुकट्या प्रवाशांनी वेगळाच घेतला आहे. रेल्वे आपलीच संपत्ती आहे त्यामुळे रेल्वेतून प्रवास करण्यासाठी तिकिटांची गरज नाही, असा सरळ सरळ अर्थ काढून ही मंडळी बिनधास्त ईकडून तिकडे प्रवास करतात. योग्य ते तिकिट घेऊनच रेल्वेतून प्रवास करावा, या आवाहनाकडे आणि विनातिकिट प्रवास केल्यास कायदेशिर कारवाई होऊ शकते, या ईशाऱ्याकडेही ही मंडळी सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसते. अवघ्या महिनाभरात अर्थात ऑगस्ट २०२३ मध्ये पकडले गेलेल्या फुकट्या प्रवाशांची संख्या लक्षात घेतल्यास ही बाब लक्षात येते.

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात ठिकठिकाणी राबविण्यात आलेल्या विनातिकिट प्रवाशांच्या विरोधातील तिकिट तपासणी मोहिमेत चक्क २ लाख, ५ हजार प्रवासी हाती लागले. त्यांनी प्रवास करताना कसलेही तिकिट काढले नव्हते. कारवाईच्या रुपात त्यांच्याकडून १२ कोटी, ४ लाखांचा दंड रेल्वे अधिकाऱ्यांनी वसूल केला.

त्याचप्रमाणे साधे तिकिट काढून एसी, स्लीपरमध्ये प्रवास करणारे आणि सोबत असलेल्या सामानाचे लगेज न काढताच (अनियमित) प्रवास करणारे १ लाख, ७ हजार प्रवासी रेल्वे अधिकाऱ्यांनी पकडले. त्यांच्याकडून दंडापोटी ४ कोटी, ८४ लाख रुपये वसूल करण्यात आले.

फुकटे प्रवासी : ऑगस्ट २०२२ - २ लाख, २८ हजार, दंडाची वसुली - १४ कोटी, ३० लाख रुपये
फुकटे प्रवासी : ऑगस्ट २०२३ - २ लाख, ५ हजार, दंडाची वसुली - १२ कोटी, ४ लाख रुपये

अनियमित प्रवास किंवा विना बुकिंग सामान (लगेज) वाहतूक प्रकरणं
ऑगस्ट २०२२ : केसेस ६४ हजार, दंडाची वसुली - २ कोटी, ९२ लाख
ऑगस्ट २०२३ : केसेस १ लाख, ७ हजार, दंडाची वसुली - ४ कोटी, ८४ लाख
 

Web Title: 2.5 lakh free train travel in a month nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.