नागपुरातील कोट बनविणाऱ्या कारखान्यात ११.२ लाखाची वीज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:35 PM2019-04-22T23:35:23+5:302019-04-22T23:39:32+5:30

हंसापुरी येथील एका इमारतीत सुरू असलेल्या कोट बनविणाºया कारखान्यात ११.२ लाख रुपयाची वीज चोरी पकडण्यात आली. शहरातील वीज वितरण कंपनी फ्रेन्चाईजी एसएनडीएलने ग्राहकावर वीज चोरीचे ११.२ लाख रुपयाचे एसेसमेंट आणि १.५ लाख रुपयाचे कम्पाऊंडिंग शुल्क ठोठावले आहे.

11.2 lakhs electricity theft in a coat-making factory in Nagpur | नागपुरातील कोट बनविणाऱ्या कारखान्यात ११.२ लाखाची वीज चोरी

नागपुरातील कोट बनविणाऱ्या कारखान्यात ११.२ लाखाची वीज चोरी

Next
ठळक मुद्दे३० किलोवॅट लोड थेट खांबावरून चोरले जात होतेहंसापुरीतील ट्रान्सफार्मरवर नजर ठेवल्याने आले उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हंसापुरी येथील एका इमारतीत सुरू असलेल्या कोट बनविणाºया कारखान्यात ११.२ लाख रुपयाची वीजचोरी पकडण्यात आली. शहरातील वीज वितरण कंपनी फ्रेन्चाईजी एसएनडीएलने ग्राहकावर वीज चोरीचे ११.२ लाख रुपयाचे एसेसमेंट आणि १.५ लाख रुपयाचे कम्पाऊंडिंग शुल्क ठोठावले आहे.
एसएनडीएलनुसार मोमीनपुरा आणि त्याच्याशी जुळलेल्या परिसरात वीजहानी मोठ्या प्रमणावर वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीची एक चमू परिसरातील ट्रान्सफार्मरचे आॅडिट करीत होती. त्यावेळी कसाबपुरा हंसापुरी येथे विजेचा अत्याधिक वापर होत असून, त्यामानाने वीज बिल मात्र कमी निघत असल्याचे आढळून आले. तेव्हा संबंधित ट्रान्सफार्मरवरून ज्या ग्राहकांना वीज पुरवठा केला जात आहे, त्यांची चौकशी करण्यात आली, तेव्हा एका इमारतीची पाहणी केली असता त्यात कारखाना सुरू होता. येथे १९७२ मध्ये सिंगल फेज कनेक्शन घेण्यात आले होते. हे कनेक्शन याकूब मो. ताहीर याच्या नावावर आहे. तीन माळ्याच्या या इमारतीमध्ये केवळ एकच कनेक्शन असल्याने संशय वाढला. या आधारावर एसएनडीएलच्या दहा सदस्यीय विशेष चमूने पोलिसांना पूर्वसूचना देऊन धाड टाकली. चमूमध्ये एका वरिष्ठ इंजिनियरसह दोन इतर इंजिनियर, दोन महिला कर्मचारी, दोन टेक्निशियन आणि एका
सुपरवायझरचा समावेश होता. या चमूने धाड टाकली तेव्हा इमारतीच्या तळमजल्यावरच मीटरने वीज पुरवठा होत होता. उर्वरित माळ्यांसाठी मीटरला बायपास करून थेट खांबावरून वीज पुरवठा घेतला जात होता. एसएनडीएलने विद्युत अधिनियम २००३ चे कलम १३५ आणि १३८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सकाळी १०.४० वाजता ही कारवाई सुरू झाली ती दुपारी १.३५ पर्यंच चालली. यादरम्यान सिंगल फेज मीटरसह वीज चोरीचा उपयोग करणाऱ्या सर्व्हिस केबलला जप्त करीत परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
५१ शिलाई मशीन, ३४ प्रेस
एसएनडीएलच्या चमूला या ठिकाणी आढळून आले की, मो. कुरैशी मो. तौफीक हे इमारतीच्या वरच्या दोन्ही माळ्यावर गेल्या अनेक वर्षांपासून कोट बनविण्याचा कारखाना चालवीत असल्याचे आढळून आले. या इमारतीमध्ये ५१ शिलाई मशीन आणि ३४ प्रेस आढळून आल्या. हे सर्व विजेवर चालणारे होते. एकूण ३० किलोवॅट कनेक्टेड लोड येथे आढळून आला. कारवाईदरम्यान ४० कामगार काम करीत होते.

Web Title: 11.2 lakhs electricity theft in a coat-making factory in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.