नागपुरातून निघणाऱ्या घनकचऱ्यात १० ते १२ टक्के प्लास्टीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 08:31 PM2018-06-04T20:31:48+5:302018-06-04T20:32:33+5:30

प्रदूषण हा विषय आता ग्लोबल झाला आहे. जगात ज्या-ज्या घटकापासून प्रदूषण होतेय त्यामध्ये प्लास्टीक सर्वात अग्रेसर आहे. कारण प्लास्टीक हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग झाले आहे. प्लास्टीकचाच सर्वात मोठा धोका पर्यावरणाला बसतोय. भारतात पर्यावरण आणि स्वच्छतेच्या बाबतीत होत असलेल्या भरपूर प्रयत्नामुळे यावर्षी युनायटेड नेशनने प्लास्टीकपासून होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी भारताला प्रतिनिधित्व दिले आहे. नागपूरचा विचार केल्यास शहरातून निघणाऱ्या घनकचऱ्यातून १० ते १२ टक्के प्लास्टीकचा समावेश असतो.

10% to 12% of plastics in Nagpur solid waste | नागपुरातून निघणाऱ्या घनकचऱ्यात १० ते १२ टक्के प्लास्टीक

नागपुरातून निघणाऱ्या घनकचऱ्यात १० ते १२ टक्के प्लास्टीक

googlenewsNext
ठळक मुद्देपर्यावरणाला प्लास्टीकचा धोकाजगभरात प्लास्टीकच्या प्रदूषणाची चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रदूषण हा विषय आता ग्लोबल झाला आहे. जगात ज्या-ज्या घटकापासून प्रदूषण होतेय त्यामध्ये प्लास्टीक सर्वात अग्रेसर आहे. कारण प्लास्टीक हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग झाले आहे. प्लास्टीकचाच सर्वात मोठा धोका पर्यावरणाला बसतोय. भारतात पर्यावरण आणि स्वच्छतेच्या बाबतीत होत असलेल्या भरपूर प्रयत्नामुळे यावर्षी युनायटेड नेशनने प्लास्टीकपासून होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी भारताला प्रतिनिधित्व दिले आहे. नागपूरचा विचार केल्यास शहरातून निघणाऱ्या घनकचऱ्यातून १० ते १२ टक्के प्लास्टीकचा समावेश असतो.
युनायटेड नेशनतर्फे १९७४ पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. दरवर्षी पर्यावरण दिनावर एक थीम ठेवल्या जाते. यावर्षी युनायटेड नेशनने ‘बीट द प्लास्टीक वेस्ट’ ही थीम ठरविली आहे. केंद्र सरकारने २०१६ मध्ये कमी जाडीच्या प्लास्टीक बॅग विक्रीवर बंदी आणली होती. सोबतच भारतात पर्यावरणाच्या बाबतीत होत असलेले काम, स्वच्छतेसाठी देशभरात राबविण्यात आलेले अभियान यामुळे भारताला या थीमवर काम करण्यासाठी प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. प्लास्टीकचे विघटन सहज होत नाही. पृथ्वीवर प्लास्टीकचे अस्तित्व बराच काळ टिकते. घनकचºयात प्लास्टीकचे अस्तित्व १० ते १२ टक्के असते. प्लास्टीक जळाल्यानंतर त्यातून मर्क्युरी, डायआॅक्साइन, फ्युरनसारखे घातक पदार्थ उत्सर्जित होतात. या घातक पदार्थापासून कर्करोगाचा धोका निर्माण होतो. भारतात तर प्लास्टीकच्या पन्नीमुळे महापुराची स्थिती निर्माण झाली होती. पाळीव जनावरांच्या मृत्यूमागे प्लास्टीक हे मोठे कारण पुढे आले आहे. समुद्र आणि तलावाच्या इकोसिस्टमला प्लास्टीकचा धोका निर्माण झाला आहे. प्लास्टीकच्या प्रदूषणाची ही भयावह स्थिती लक्षात घेता, प्लास्टीकच्या वापरावर नियंत्रण मिळविणे गरजेचे झाले आहे.
जगभरात प्लास्टीकचे वास्तव
५०० बिलियन प्लास्टीक बॅगचा दरवर्षी उपयोग होतो.
१३ मिलियन प्लास्टीक दरवर्षी समुद्रात जाते.
१७ मिलियन बॅरल आॅईल प्लास्टीक बनविण्यास वापरले जाते.
१ लाख समुद्री जीव प्लास्टीकमुळे मरतात.
महाराष्ट्र सरकारच्या प्लास्टीक बंदीवर आक्षेप
महाराष्ट्र सरकारने २३ मार्च २०१८ रोजी प्लास्टीकवर बॅन आणले आहे. प्लास्टीकच्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत. लाखो लोक त्यात काम करीत आहे. त्यामुळे प्लास्टीक बंदी महाराष्ट्र सरकारसाठी शक्य नाही. युनायटेड नेशनच्या मते सिंगल टाईम उपयोगात येणाऱ्या प्लास्टीकवर नियंत्रण आणल्यास ५० टक्के प्लास्टीक प्रदूषण कमी होऊ शकते.
नागपुरातही प्लास्टीकचा धोका
नागपूरचा विचार केल्यास शहरातून निघणाऱ्या घनकचऱ्यातून १० ते १२ टक्के प्लास्टीकचा समावेश असतो. हा कचरा जशास तसा डम्पिंग यार्डमध्ये जमा होतो. या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने भांडेवाडीत लाखो मेट्रिक टन कचरा आजही पडला आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणून भांडेवाडीत आग लागण्यासारखे प्रकार नेहमीच घडताना दिसताहेत.
 तरच मिळू शकते प्लास्टीकवर नियंत्रण
एकदा वापरून फेकणाऱ्या प्लास्टीकवर नियंत्रण आणल्यास ५० टक्के प्रदूषण कमी होऊ शकते. प्लास्टीक निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी वस्तूच्या लाईफ सायकलची गॅरंटी घेऊन, वस्तू खराब झाल्यानंतर परत घेऊन त्याचा उपयोग झाला पाहिजे. घनकचरा संकलनाचे व्यवस्थापन सुधारावे लागेल. सरकारला प्लास्टीकचा पर्याय शोधावा लागेल.
कौस्तुभ चॅटर्जी, समन्वयक, ग्रीन व्हिजिल संस्था

Web Title: 10% to 12% of plastics in Nagpur solid waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.