अणुशक्तीपेक्षा युवाशक्ती प्रभावी ठरू शकते

By admin | Published: May 31, 2015 01:26 AM2015-05-31T01:26:17+5:302015-05-31T01:26:17+5:30

अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१५’ हे शैक्षणिक प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे.

Youth power can be effective than nuclear power | अणुशक्तीपेक्षा युवाशक्ती प्रभावी ठरू शकते

अणुशक्तीपेक्षा युवाशक्ती प्रभावी ठरू शकते

Next

शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केला विश्वास : ‘लोकमत’ अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरचे थाटात उद्घाटन

पुणे : ‘‘केवळ शिक्षणाच्या माध्यमातूनच युवाशक्तीचा विकास होऊ शकतो. त्यामुळे गोंधळलेल्या स्थितीतील युवकांना योग्य अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१५’ हे शैक्षणिक प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. भारतातील युवाशक्ती एकत्र आली तर अणुशक्तीपेक्षा प्रभावी ठरू शकते. देशाच्या उन्नतीसाठी या युवाशक्तीचा योग्य उपयोग करून घ्यायला हवा,’’ असे मत सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.

‘लोकमत’च्या वतीने आणि ‘द युनिक अ‍ॅकॅडमी’ व ‘न्यू इंडिया इंश्योरन्स’च्या सहकार्याने गणेश कला क्रीडा केंद्र येथे आयोजित लोकमत ‘अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१५’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी द युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव, न्यू इंडियाइंश्योरन्सच्या कल्पना गणात्रा, ‘लोकमत’चे महाव्यवस्थापक मिलन दर्डा, उपमहाव्यवस्थापक (एम विभाग) अलोक श्रीवास्तव, निर्मिती महाव्यवस्थापक बाजीराव ढवळे आदी उपस्थित होते.
मुजुमदार म्हणाले, ‘‘देशातील १२० कोटी लोकसंख्येपैकी सुमारे ६० टक्के लोकसंख्या २५ वर्षांखालील आहे. इतर कोणत्याही देशांमध्ये एवढी तरुणशक्ती नाही. देशाच्या विकासासाठी या युवाशक्तीचा उपयोग करून घ्यायला हवा. पूर्वी इंजिनिअर, मेडिकल, वकील आणि शेवटी शिक्षक या अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्रवेश घेत होते. मात्र, आता अनेक अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडताना घाई करू नये. अशा अभ्यासक्रमाची निवड करा, की जो आयुष्याला कलाटणी देणारा असेल.’’
एखाद्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यानंतर धडपड करून कोणत्याही परिस्थितीत तो पूर्ण करावा, असे नमूद करून मुजुमदार म्हणाले, ‘‘कोणताही अभ्यासक्रम पूर्ण केला तर त्यावर रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात. त्याची माहिती विद्यार्थ्यांनी घ्यायला हवी. रोजगार कसा मिळवायचा हे विद्यार्थ्यांवर अवलंबून असते.’’
तुकाराम जाधव म्हणाले, ‘‘यूपीएससी व एमपीएससी या स्पर्धा परीक्षांबाबत अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर व्हावेत या उद्देशाने युनिक अ‍ॅकॅडॅमीतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या प्रदर्शनामध्ये स्पर्धा परीक्षांबरोबरच करिअर घडविण्यासाठी निर्माण झालेल्या नवीन क्षेत्रांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांनी या प्रदर्शनाचा अधिकाधिक लाभ घ्यावा.’’
(प्रतिनिधी)

‘लोकमत’चा उपक्रम स्तुत्य असून, तो तरुणांची उच्च शिक्षणाची भूक भागविण्यासाठी आवश्यक आहे. ही भूक शमविण्यासाठी अ‍ॅस्पायर फेअर उपयुक्त ठरणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांपैकी नेमका कोणता अभ्यासक्रम निवडावा हे विद्यार्थ्यांना समजत नाही. आई-वडिलांनी सांगितलेल्या किंवा मित्रांनी निवडलेल्या अभ्यासक्रमांना अनेक मुले प्रवेश घेतात. त्यामुळे मुलांची फसगत होते. उच्च शिक्षणासाठी निवडलेला अभ्यासक्रम हा आयुष्याला कलाटणी देणारा असतो. विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून योग्य अभ्यासक्रमाची निवड करता येईल. परंतु, कोणत्याही अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शिक्षण संस्थेला भेट द्यावी, संबंधित संस्थेच्या संचालकांशी तसेच माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. त्यानंतरच विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा.
- डॉ. शां. ब. मुजुमदार,
संस्थापक-अध्यक्ष, सिम्बायोसिस

अतिशय व्यावसायिकदृष्टीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे़ या प्रदर्शनाला सुरुवातीपासूनच मिळणारा प्रतिसाद अतिशय चांगला आहे़ या प्रदर्शनाला मी पुन्हा भेट देणार आहे़
- कल्पना गणात्रा,
विभागीय व्यवस्थापिका, न्यू इंडिया एंश्योरन्स


अतिशय उत्तम प्रकारे या प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे़ विद्यार्थी आणि पालक यांना यातून करिअरच्या वेगवेगळ्या संधींची ओळख होत आहे़ या प्रदर्शनात पारंपरिक शिक्षणाबरोबरच नव्या प्रकाराचे क्षेत्रही समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे़
- तुकाराम जाधव, संचालक, युनिक अ‍ॅकॅडमी

सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटतर्फे शिष्यवृत्ती योजना
४सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटतर्फे विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना निर्माण करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये दहावी, बारावीत अव्वल आलेल्यांना सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमा, कनिष्ठ महाविद्यालय, पदवीचे शिक्षण घेणाऱ्यांना शुल्कामध्ये १०० टक्के सवलत देण्यात आली आहे. विद्यापीठात पदवी परीक्षेत अव्वल आलेल्यांना उच्च पदवी, डिप्लोमाच्या शिक्षणासाठीही शुल्कामध्ये १०० टक्के सवलत देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त लोकमत अ‍ॅस्पायर प्रदर्शनात जे विद्यार्थी प्रवेश अर्ज भरतील त्यांना उच्च शिक्षणाच्या कोर्स शुल्कात १० टक्के, पदवीच्या शिक्षणात २० टक्के सवलत मिळणार आहे.
द युनिक अ‍ॅकॅडमी
४युनिक अ‍ॅकॅडमीच्या स्टॉलवर यूपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या फाउंडेशन कोर्सेसची तसेच पीएसआय, एसटीआय, आयएएस, आयआरएस, आयएएस पदांबाबतची माहिती दिली जात आहे. या स्टॉलवर संबंधित परीक्षांशी निगडित पुस्तकेही उपलब्ध करण्यात आली आहेत.

तेहमी ग्रॅँट इन्स्टिट्यूट
आॅफ नर्सिंग एज्युकेशन
४हे महाविद्यालय रुबी हॉल क्लिनिकशी संलग्न आहे. रुबी हॉल क्लिनिकच्या ७५० शाखा आहेत. या महाविद्यालयामध्ये १२वी नंतरचा ४ वर्षांचा बेसिक नर्सिंग कोर्स म्हणजेच बीएससी कोर्स आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचा एमएससीचा २ वर्षांचा कोर्स आहे. येथे विद्यार्थ्यांना एनजीओकडून स्कॉलरशिप दिली जाते. लायला पूनावाला स्कूल, रतन टाटा, दोराबजी टाटा, समाजकल्याण अशा विविध स्कॉलरशिप्सचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येतो. तसेच ही संस्था नॅट मान्यताप्राप्त आहे. याशिवाय येथे १०० टक्के नोकरीची खात्री आहे.

डी. वाय. पाटील कॉलेज आॅफ एज्युकेशनल कॉम्प्लेक्स
४या संस्थेची केवळ वैद्यकीय महाविद्यालये नसून इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, माहिती तंत्रज्ञान, मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, कृषी महाविद्यालय आदी कॉलेजेस देखील आहेत. यामध्ये दळणवळण सुविधा, ग्रंथालय, संदर्भ पुस्तके, जिम, क्रीडा सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत.

नॉव्हेल्स एनआयबीआर कॉलेज आॅफ हॉटेल मॅनेजमेंट
हे कॉलेज निगडीला आहे. येथे अनुभव असलेले प्राध्यापक, रिझनेबल फी, पायाभूत सुविधा, वसतिगृह, व्यक्तिमत्त्व विकास, मर्यादित जागा, तसेच ग्लोबल इंटर्नशिप्स अ‍ँड प्लेसमेंटस, मोफत इंग्लिश बोलण्याचे प्रशिक्षण आणि बेसिक फ्रेंचचे प्रशिक्षण देण्यात येते.
भगिनी निवेदिता सहकारी बॅँक मर्यादित
या बॅँकेला सर्वोत्कृष्ट बॅँकेचा राज्य शासनाचा प्रथम राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. येथे आकर्षक व्याजदराच्या व सहजपणे उपलब्ध अत्यंत सुरक्षित व फायदेशीर मुदतठेवी आहेत. शैक्षणिक कर्ज सुविधादेखील येथे आहे. तसेच कर्जाची वैशिष्ट्ये म्हणजे वाजवी व्याजदर, वाजवी हफ्ता, गरजेनुसार मुदत, पूर्ण पारदर्शक व्यवहार, मुदतपूर्व कर्जफेडीसाठी दंड नाही, तसेच छुपे आकार आकारले जाणार नाहीत.

नारळीकर इन्स्टिट्यूट
दहावी बारावीनंतर कोणते कोर्सेस करता येतील यांची माहिती विद्यार्थ्यांसाठी दिली जाते. यामध्ये डिप्लोमा इन मायक्रोप्रोसेसर अ‍ॅन्ड मायक्रोकन्ट्रोलर्स, डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, रेडिओ आॅडिओ व्हीडोयो सर्व्हीसिंग, अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन कम्युटर हार्डवेअर अ‍ॅन्ड नेटवर्कींग, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स ट्रबलेशुटींग टेक्निक्स, डिप्लोमा इन ग्राफीक डिझाईन अ‍ॅन्ड अ‍ॅनिमेशन, डिप्लोमा इन कम्युटराइज्ड अकाऊटींग अ‍ॅन्ड टॅक्सेशन, डिप्लोमा इन कम्युटर अ‍ॅनिमेशन, सर्टीफिकेट कोर्स इन बिल्डींग साइट सुपरव्हीजन, अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन इंटेरीयर डिझाइन अ‍ॅन्ड डेकोरेशन, स्किल डेव्हलपमेंट.
अभिनव एज्युकेशन सोसायटी
या संस्थेमध्ये १२वी नंतरचे वाणिज्य, शास्त्र, कला शाखेतील विविध कोर्स आहेत. तसेच इंजिनिअरींगचे कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इ अ‍ॅँड टी सी, माहिती तंत्रज्ञान, मेकॅनिकल, सिव्हील इंजिनिअरींगही येथे आहे. येथे अनुभवी प्राध्यापक, सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त ग्रंथालय आणि लॅब्स उपलब्ध आहेत.

इंदिरा इन्स्टिट्यूट आॅफ एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग पुणे
एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनिअरिंग कोर्स क रू इच्छिणाऱ्यांसाठी सीईटी परीक्षा देण्याचे बंधनकारक नाही. या कोर्ससाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये १२वीत पास असणे अपरिहार्य आहे. या कोर्सनंतर १०० टक्के नोकरी, विविध नामांकित कंपन्यांशी टायअप, तंत्रज्ञानयुक्त लॅब्स आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
अलार्ड ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट पुणे
येथे मॅनेजमेंटमधील एमबीए, एमसीए, फार्मसीमधील बी.फार्म., एम.फार्म., डिप्लोमा आदी अभ्यासक्रम, बिझनेस स्टडीमधील बीबीए, बीसीए कोर्स उपलब्ध आहेत. याशिवाय कॉम्प्युटर लॅब, ग्रंथालय, कँटीन, जिम, क्रीडांगण, वसतिगृह सुविधा आहेत.

ज्ञानगंगा कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅँड रिसर्च
या ठिकाणी इंजिनिअरिंगमधील कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, ई अ‍ॅँड टी सी, माहिती तंत्रज्ञान, मेकॅनिकल, सिव्हिल तसेच एमबीए असे विविध अभ्यासक्रमाचे कोर्स करता येणार आहेत. या महाविद्यालयात स्कॉलरशिप, नोकरी, कॉम्प्युटर सेंटर, कॅँटीन, वसतिगृह, ट्रान्स्पोर्ट आदी सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

सुदर्शन कॉलेज
आॅफ मॅनेजमेंट
सुदर्शन एज्युकेशनल फाउंडेशन संचलित महाराष्ट्र राज्य ज्ञानकल्प शिष्यवृत्ती प्रमाणपत्र स्पर्धा परीक्षेंतर्गत प्रथम शिष्यवृत्ती १ लाखाची, ट्रॉफी व गोल्ड मेडल दिले जाणार आहे. तसेच पहिल्या २०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये दिले जाणार आहेत. यामध्ये सर्वोत्तम शाळा पुरस्कार, मुख्याध्यापक पुरस्कार दिले जाणार असून, सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

मिटकॉन
येथे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. यामध्ये एक्स्पोर्ट इम्पोर्ट मॅनेजमेंट, डिप्लोमा इन टेक्नॉलॉजी, इंटिरियर डिझायनिंग अँड डेकोरेशन, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन सुपरवायझर, प्लॅस्टिक तंत्रज्ञान उद्योग, मोबाईल दुरुस्ती, डिप्लोमा इन फूड प्रॉडक्शन अ‍ॅँड सर्व्हिसेस, शेअर मार्केट, रिअल इस्टेट क न्सल्टंट, चारचाकी वाहन दुरुस्ती, व्हॉईस ओव्हर अ‍ॅँड डबिंग, फळे व भाजीपाला प्रक्रिया, बेकरी प्रॉडक्ट्स निर्मिती, प्रोफेशनल फोटोग्राफी आदींचा समावेश आहे.
इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स
१२वी नंतरचे बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएससी, बीकॉम, बीए आदी तर पदव्युत्तर एमएस्सी, एमकॉम, एमए, एमएमएम कोर्स उपलब्ध आहेत. या शिवाय मॅनेजमेंटमधील एमबीए, एमपीएम, एमसीएम आदी कोर्स उपलब्ध आहेत. ही संस्था जीवनावश्यक जोडअभ्यासक्रम, परदेशी भाषांचे अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अभ्यासासाठी निसर्गरम्य वातावरण येथे मिळते.

ढोले पाटील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग
येथे युनिव्हर्सिटी ग्रॅँटचे मेकॅनिकल, आॅटोमोबाईल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, माहिती तंत्रज्ञान आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील एमई व्हीएलएसआय अ‍ॅँड एम्बेडेड सिस्टिम, एमई हीट पॉवर, मशिन डिझाईन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, एमबीए उपलब्ध आहे.

श्री रामचंद्र कॉलेज
आॅफ इंजिनिअरिंग पुणे
या महाविद्यात बी.ई.मधून मेकॅनिकल, कॉम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स तर एम.ई.मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंंग डिझाईन, ई अ‍ॅँड टी सी इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कोर्सेस करता येतील. याशिवाय १२वी नंतरच्या पॉलिटेक्निक डिप्लोमामधून मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण घेता येईल.

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पुणे
या संस्थेची पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निक , एस.बी. पाटील इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट, शास्त्र आणि वाणिज्य शाखा महाविद्यालय, इंजिनिअरिंग महाविद्यालय, इंजिनिअरिंग अ‍ॅँड रिसर्च, आर्किटेक्चर अ‍ॅँड डिझाईन, एस. बी. पाटील पब्लिक स्कूल अशी विविध महाविद्यालये आहेत. या ठिकाणी उच्च शिक्षणाची सोय, प्रोत्साहनपूर्वक प्रशिक्षण, रिसर्च ग्रॅन्ट्स आणि स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट्स, पालक-शिक्षक संवाद अशा सुविधा आहेत.

एएसएम ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट
येथे माहिती तंत्रज्ञानामधील एमसीएम, एमसीए, एमएससी, मॅनेजमेंटशी निगडित एमबीए, एमपीएम, पीजीडीएम, एमएमएस, पीजीडीएफ टी, बारावीनंतरचे बीबीए, बीएमएस, बीबीएम, बीसीए, बीएससी, बीकॉम आणि पार्ट टाईममधील एमएमएम, एमएफएम, एमबीएस, एमएचआरडीएम, पीजीडीआयबी, पीजीडीटी, पीजीडीबीएम, पीजीडीटी असे कोर्सेस आहेत. पीजीडीएम या कोर्समध्ये मार्केटिंग, फायनान्स, आंतरराष्ट्रीय व्यवसाय असे विशेष अभ्यासक्रमही आहेत.

कॉसमॉस बॅँक
येथे महिला उद्योजकांसाठी विशेष ‘वूमन लोन’ या उपक्रमाखाली काही सवलती व सोयी-सुविधांचा लाभ घेता येणार आहे. सवलतीचा व्याजदर, परतफेडीसाठी सोईस्कर कालावधी, अत्यल्प प्रोसेसिंग फी, अर्थसहाय्य कॅश क्रेडिट व टर्म लोन पर्यार्यांमध्ये उपलब्ध, बॅँकेचे सभासदत्व या सवलतींचा फायदा महिला उद्योजकांना घेता येणार आहे.

Web Title: Youth power can be effective than nuclear power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.