आम्ही उद्धघाटन केल्यावर कामे करतो केवळ नारळ फोडत नाही - दानवे

By Admin | Published: December 25, 2016 10:16 PM2016-12-25T22:16:48+5:302016-12-25T22:52:33+5:30

आम्ही उद्धघाटन केल्यावर कामे करतो, केवळ नारळ फोडत नाही

We work on excavation and do not break coconut - demons | आम्ही उद्धघाटन केल्यावर कामे करतो केवळ नारळ फोडत नाही - दानवे

आम्ही उद्धघाटन केल्यावर कामे करतो केवळ नारळ फोडत नाही - दानवे

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
सिल्लोड, दि. 25 - आम्ही उद्धघाटन केल्यावर कामे करतो, केवळ नारळ फोडत नाही. ज्या रस्त्याचे आमदारांनी या पूर्वीच उद्धघाटन केले त्याचे ई-टेंडर आता झाले आहे. जळगाव-औरंगाबाद, अजिंठा- बुलढाणा-सिल्लोड-जालना या रस्त्याचे 6 पदरी काम 3 महिन्यांत सुरू होईल. कामे झाले नाही तर आगामी निवडणुकीत भाजपाला मतदान करू नका, असे बोलून आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केवळ उद्धघाटन करून श्रेय घेत असल्याचे आरोप केले. सिल्लोड तालुक्यातील तळनी येथे (दि. 25) भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्वांना उद्घाटनाची घाई झाली आहे. कुणी कितीही घाई केली तरी काम मजूर आम्ही केले आहे आणि याचा फायदा भाजप लांच होईल असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

शाळेतच केले उद्धघाटन
सिल्लोड तालुक्यातील तळणी येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत शाळेसमोर विविध 85 लाख रुपयाच्या विविध विकास कामाचे 4 नाम फलकाचे उद्धघाटन केले. खरेतर जिथे हे काम होणार आहे तेथे हे उद्धघाटन होने गरजेचे होते. पण वेळ नसल्याने व वाहन त्या ठिकाणी जात नसल्याने शाळेच्या प्रांगनात हे उद्धघाटन करण्यात आले. या मुळे हां चर्चेचा विषय झाला आहे. 

Web Title: We work on excavation and do not break coconut - demons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.