अभ्यासगटाच्या शिफारशी लवकरच

By Admin | Published: July 16, 2016 03:30 AM2016-07-16T03:30:55+5:302016-07-16T03:30:55+5:30

सटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भात वेतनश्रेणी अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यासगटाच्या शिफारशी येत्या चार महिन्यांत सादर होतील

Study group recommendation soon | अभ्यासगटाच्या शिफारशी लवकरच

अभ्यासगटाच्या शिफारशी लवकरच

googlenewsNext

मुंबई : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भात वेतनश्रेणी अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यासगटाच्या शिफारशी येत्या चार महिन्यांत सादर होतील, अशी माहिती परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली. वेतनश्रेणी अभ्यासगटाची पहिली बैठक रावते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या वेळी कामगारांच्या वेतनाबरोबर त्यांना मिळणारे भत्ते, प्रोत्साहन योजना याबाबतही अभ्यासगट शिफारशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या ६८ वर्षांत एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कोणतीच रचनात्मक व्यवस्था निर्माण झालेली नाही. दर चार वर्षांनी विशिष्ट पद्धतीने कामगारांना वेतनवाढ दिली जाते. कामाचे स्वरूप आणि मिळणारे वेतन याचा संबंध जुळवून वेतननिश्चिती झाली पाहिजे. याच उद्देशाने वेतन अभ्यासगटाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याची पहिली बैठक पार पडली. या बैठकीला रावते यांच्यासह एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल आणि वेतन अभ्यासगटाचे अध्यक्ष डी.आर. परिहार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अभ्यासगटाच्या कार्यक्षमतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. एसटी कामगारांशी प्रतिनिधिक स्वरूपात संवाद साधून त्यांच्या गरजा व अपेक्षा जाणून घ्याव्यात, वेतनासंदर्भात शिफारशी करताना एसटीच्या फायदा-तोट्याचा पूर्वलक्षी प्रभावाने विचार करू नये. कामगाराला मिळणारे प्रत्यक्ष वेतन, महागाई निर्देशांक व वस्तुस्थितीजन्य
गरजा लक्षात घ्याव्यात आणि परिवहन सेवा देणाऱ्या अन्य निमशासकीय महामंडळाच्या वेतन पद्धतीचाही अभ्यास करावा, अशा सूचना रावते यांनी केल्या.
एसटी महामंडळातील अधिकारी वर्गाच्या वेतननिश्चितीबाबतही अभ्यासपूर्व शिफारशी वेतनश्रेणी अभ्यास गटाकडून केल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Study group recommendation soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.