राज्यातील १० जिल्ह्यांत अद्यापही पावसाची प्रतीक्षा; पालघर, अकोला, यवतमाळात सर्वात कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 03:10 AM2020-06-29T03:10:28+5:302020-06-29T07:03:52+5:30

नांदेडचा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. उत्तर कोकणच्या काही भागात पावसाचे प्रमाण कमी आहे़

Still waiting for rains in 10 districts of the state; Palghar, Akola, Yavatmal received the lowest rainfall | राज्यातील १० जिल्ह्यांत अद्यापही पावसाची प्रतीक्षा; पालघर, अकोला, यवतमाळात सर्वात कमी पाऊस

राज्यातील १० जिल्ह्यांत अद्यापही पावसाची प्रतीक्षा; पालघर, अकोला, यवतमाळात सर्वात कमी पाऊस

Next

पुणे : देशभरात पावसाची चांगली सुरुवात झाली असली तरी राज्यात १० जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे़ त्यामुळे तेथे चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. १४ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक तर ५ जिल्ह्यांत सरासरीच्या ६० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे़
राज्यात ११ जूनपासून पाऊस सक्रिय झाला आहे़ त्यानंतर दोन-तीन दिवसांतच मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला़ मात्र संपूर्ण राज्यात त्याचे प्रमाण विषम आहे़ यंदा मराठवाड्यात सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला़

नांदेडचा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. उत्तर कोकणच्या काही भागात पावसाचे प्रमाण कमी आहे़ पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३५ टक्के कमी पाऊस पडला. अहमदनगर जिल्ह्यात यंदा २८ जूनपर्यंत पावसाने उच्चांक नोंदविला आहे़ तेथे सरासरीच्या दुपटीहून अधिक ११३ टक्के पाऊस झाला आहे़ राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे़

सरासरीपेक्षा कमी पाऊस (टक्के)
पालघर (-३५), अकोला (-३३), यवतमाळ (-२९), मुंबई उपनगर (-२३), मुंबई शहर (-२१), रायगड (-१२), ठाणे (-९), गोंदिया (-१३),
वर्धा (-८), गडचिरोली (-४)

Web Title: Still waiting for rains in 10 districts of the state; Palghar, Akola, Yavatmal received the lowest rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस