समृद्धी महामार्गाबाबत शिवसेनेत एकवाक्यताच

By admin | Published: July 15, 2017 01:18 AM2017-07-15T01:18:42+5:302017-07-15T01:18:42+5:30

समृद्धी महामार्ग योजनेबाबत शिवसेना शेतकऱ्यांबरोबर आहे.

Shivsena's unity is about the prosperity of the highway | समृद्धी महामार्गाबाबत शिवसेनेत एकवाक्यताच

समृद्धी महामार्गाबाबत शिवसेनेत एकवाक्यताच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : समृद्धी महामार्ग योजनेबाबत शिवसेना शेतकऱ्यांबरोबर आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे परस्पर विरोधी वक्तव्य करत नसून शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने त्यांच्या जमिनी लाटल्या जाऊ नयेत ही पक्षाची भुमिका आहे; असे शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांनी सांगितले. कामकाजात भाजपा मंत्र्यांचे चांगले सहकार्य मिळत असते असे त्या म्हणाल्या.
विधानपरिषदेच्या नियोजित अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पक्षप्रमुख ठाकरे मार्ग होऊ देणार नाही म्हणत आहेत तर शिवसेनेचे मंत्री जमीनी अधिग्रहीत करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित रहात आहेत याकडे लक्ष वेधले असता त्यांनी, शिवसेना शेतकऱ्यांबरोबर आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेण्यात येऊ नये इतकेच शिवसेनेचे म्हणणे आहे व मंत्री शिंदे यांचेही तेच मत आहे व यात परस्परविरोधी असे काहीच नाही असे त्या म्हणाल्या.
राज्यातील पेट्रोल पंपांवर होणारी चोरी आपण सिद्ध केली आहे, त्यामुळे सरकारने याबाबतीत उपाययोजना कराव्यात अशी मागणीही अधिवेशनात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय आय. टी. क्षेत्रातील महिलांची सुरक्षा, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतुकीची बेशिस्त, कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर याच्या कामकाजात सुधारणा, आळंदी, सिद्धबेट विकास आराखडट्याचा पाठपुरावा आदी विषयांवर अधिवेशनात विचारणा करणार असल्याचे डॉ. निलीम गोऱ्हे यांनी सांगितले.
पुणे महापालिकेत पुर्णवेळ आरोग्य प्रमुख नाही. सहायक आरोग्यप्कमुखांच्याही काही जागा रिक्त आहेत. अशीच स्थिती राज्यातील अन्य महापालिकांमध्येही आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर याची चर्चा केली असून त्यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र याबाबत आपण विधानपरिषदेत प्रश्न विचारणार आहे.
स्मार्ट सिटी योजनेत पुण्याची निवड झाली, मात्र काही लाखांपैकी फक्त काही हजार लोकांना प्रश्नावली देऊन त्यांच्या उत्तरांवर योजनेचा
अजेंडा ठरवला जात आहे यावर गोऱ्हे यांनी टीका केली. लोकप्रतिनिधींना महत्व न देता सरकारी अधिकारीच निर्णय घेत आहेत याकडेही
सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे
त्या म्हणाल्या.
>मुंढे महत्वाकांक्षी तर आयुक्त मेहनती
पीएमपीएल चे व्यवस्थापकीय संचालक महत्वाकांक्षी आहेत, भविष्यात ते राजकारणात उतरले तर आश्चर्य वाटायला नको. महापालिका आयुक्त मेहनती आहेत, मात्र थेट पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क असल्याने लोकप्रतिनिधींना ते विचारत नाहीत. हे दोन्ही अधिकारी प्रमुख असणाऱ्या पीएमपीएल व महापालिका या व्यवस्थांविषयी आपण विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहोत असे आमदार डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

Web Title: Shivsena's unity is about the prosperity of the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.