जिल्ह्यात शिवसेनेचे मताधिक्क्य

By Admin | Published: March 6, 2017 03:23 AM2017-03-06T03:23:12+5:302017-03-06T03:23:12+5:30

शिवसेनेने विक्रमी तीन लाख चार हजार ९१३ मते मिळवित मतदारांमध्ये प्रथम लोकप्रिय असल्याचे दाखवून दिले आहे.

Shiv Sena's apathy in the district | जिल्ह्यात शिवसेनेचे मताधिक्क्य

जिल्ह्यात शिवसेनेचे मताधिक्क्य

googlenewsNext

आविष्कार देसाई,
अलिबाग- नुकत्याच झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने विक्रमी तीन लाख चार हजार ९१३ मते मिळवित मतदारांमध्ये प्रथम लोकप्रिय असल्याचे दाखवून दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मताधिक्क्य घटून त्यांना फक्त एक लाख ६५ हजार ७०८ मतदारांनीच कौल दिला आहे. भाजपा आणि शेकापच्या मतदारांचा आलेख मात्र चढता राहिला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचीही पीछेहाट झाली आहे. आगामी काळात जिल्ह्यात शिवसेनेची घोडदौड ही अन्य प्रमुख पक्षांची डोकेदुखी ठरणार आहे.
ग्रामीण राजकारणात एकेकाळी शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मक्तेदारी असायची, ती शिवसेनेने मोडीत काढली आहे. १०० कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेला केंद्र आणि राज्य सरकारचा सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी येतो. त्यामुळे सुमारे ३०० कोटी रुपयांच्या जिल्हा परिषदेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याच हातात असाव्यात असे सर्वच राजकीय पक्षांना वाटणे स्वाभाविक आहे. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे हुशार नेते आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये सर्वाधिक वेळा बसण्याचा मान हा शेकापलाच जातो. राष्ट्रवादी काँग्रेसनेही कमी-अधिक प्रमाणात सत्ता उपभोगली आहे. पाटील आणि तटकरे या दोन नेत्यांची जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड आणि प्रशासनावर जबरदस्त अंकुश आहे. यंदाच्या निवडणुकीत त्यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेने विशिष्ट व्यूहरचना आखली होती. गेल्या वर्षभरापासून शिवसेनेने जनतेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न सुरू केला होता. पाटील-तटकरे हे घोटाळेबाज नेते असल्याचे राजकीय भांडवल करून त्याचा डंका अखंड जिल्हाभर पिटला गेला. त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते हे पहिल्या क्रमांकावर होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी झंझावाती दौरे करून शिवसेनेला कौल देण्याचे मतदारांना आवाहन केले. शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसला रोखण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस आणि भाजपा यांची एकत्रित मोट बांधली. त्याला बहुतांश प्रमाणात यश आल्याचे निकालावरून दिसून येते. शेकापला २३ जागा, शिवसेनेला १८ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त १२ जागा आणि काँग्रेस-भाजपाला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या होत्या. शेकाप-राष्ट्रवादी युतीचा फायदा शेकापला जास्त झाला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला या युतीने तारले, असेच म्हणावे लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकचा पक्ष होता. त्या खालोखाल शेकाप आणि नंतर शिवसेनेचा क्रमांक होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापचे मताधिक्क्य सर्वाधिक होते. शिवसेना तेव्हा गणतीमध्येही नव्हती. मात्र शिवसेनेने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तब्बल तीन लाख चार हजार ९१३ मते मिळवली. शिवसेनेने मारलेली ही जोरदार मुसंडी सर्वच राजकीय पक्षांना विचार करायला लावणारी आहे. शेकापला दोन लाख ७७ हजार ३३२ मते मिळाली तर, राष्ट्रवादी काँग्रेसला एक लाख ६५ हजार ७०८, काँग्रेसला एक लाख ३० हजार ४९२, भाजपाला एक लाख ११ हजार १७० मते मिळाली. ग्रामीण निवडणुकीतील मतांची बेरीज ही भाजपासाठी चांगली गोष्ट आहे.
पनवेल तालुक्यामध्ये शेकाप एक नंबरवर राहिला आहे. त्यांना ७८ हजार ३२६ मते मिळाली, दोन नंबरवर भाजपा, त्यांना ५० हजार ८३३ मते तर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना राहिली. त्यांना नऊ हजार ४२१ मते मिळाली.
>तालुकानिहाय मिळालेली मते
तालुकाशेकापशिवसेना राष्ट्रवादीभाजपाकाँग्रेस
पनवेल ७८,३२६ ९,४२१ ००५०,८३३ ००
कर्जत१५,८५९ ३१,५९६ ३२,४३२ ९,२७० ६,३७५
खालापूर५,२५२ ३२,९६५ ३०,००२ २,१८९ ००
सुधागड १२,१०१ ०० ९,०२४ ०० ००
पेण ४६, १४७ १४,०४७ २,७८२, १०,०८६ २१,१५३
उरण७,९८९२२,९७० ०० २०,९९० १८,१९८
अलिबाग६८,२१५ ३०,२१७ ०० १,८२० ३२,१०९
मुरुड १६,०४८ १४,७२४ ०० ८६९ ००
रोहे १२,२४४ २३,८८२ ३२,३३७ ७,२१५ ००
तळा ०० ६,०७० १०,०६० १,६४० ४२९
माणगाव ९,०३३ ३३,९८८ १९,१२९ २,५९१ १२,१५८
म्हसळा ०० ९,१४७ ११,२१६ २,३७३ १,९१५
श्रीवर्धन ०० १३,७४८ १३,६९०१,८३९ ४५१
महाड ०० ४३,१५७ ३,९३४१,६९५ ३३,१३५
पोलादपूर ६,११८ ११,२८१ १,१०२०० ४,५६९

Web Title: Shiv Sena's apathy in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.