उरल्यासुरल्या पिकांची झाली नासाडी, बळीराजा संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 12:16 PM2023-12-02T12:16:19+5:302023-12-02T12:16:51+5:30

Mumbai: राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे अनेक भागांत वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने उरल्यासुरल्या पिकांवर पाणी फिरले आहे.  

Remaining crops were ruined, Baliraja was in crisis | उरल्यासुरल्या पिकांची झाली नासाडी, बळीराजा संकटात

उरल्यासुरल्या पिकांची झाली नासाडी, बळीराजा संकटात

मुंबई - राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे अनेक भागांत वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने उरल्यासुरल्या पिकांवर पाणी फिरले आहे.  

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. ७५० गावांत १ लाख १ हजार ३०४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शुक्रवारी सकाळपर्यंत ७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातही सलग चौथ्या दिवशी पाऊस होता. जालना जिल्ह्यात सर्वदूर, तर धाराशिवमधील भूम तालुक्यात पाऊस झाला. धुळे, जळगाव, अहमदनगर व नंदूरबार जिल्ह्यांनाही वादळी पावसाने झोडपले. परिणामी केळीचे नुकसान झाले. प. विदर्भातील अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यांत सलग पाचव्या दिवशी पाऊस होता. 

अहवाल मिळताच मदत : मुख्यमंत्री
नागपूर : विदर्भासह राज्याच्या विविध भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. अहवाल प्राप्त होताच तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिली. 

पावसाची शक्यता  
खान्देश - नाशिक, सोलापूरसह राज्यातील १० जिल्ह्यांत शनिवारी ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता.  
मराठवाडा : ४ आणि ५ डिसेंबरला ढगाळ वातावरण,  तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ६ डिसेंबरपासून पूर्णत: उघडीप मिळेल.

Web Title: Remaining crops were ruined, Baliraja was in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.