‘लोकमत’च्या प्रशांत खरोटे यांना छायाचित्रणाचा आंतरराष्टÑीय पुरस्कार, ‘फोटो हंटर्स’ स्पर्धा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 04:26 AM2017-09-12T04:26:45+5:302017-09-12T04:27:24+5:30

‘फोटो हंटर्स असोसिएशन’कडून भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ‘फोटो हंटर्स’ स्पर्धेत पत्रकारिता गटात ‘लोकमत’ नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी एक सुवर्ण व रजतपदक प्राप्त केले.

 Prashant Khorro of 'Lokmat' won the International Film Festival of Photography, 'Photo Hunters' competition | ‘लोकमत’च्या प्रशांत खरोटे यांना छायाचित्रणाचा आंतरराष्टÑीय पुरस्कार, ‘फोटो हंटर्स’ स्पर्धा  

‘लोकमत’च्या प्रशांत खरोटे यांना छायाचित्रणाचा आंतरराष्टÑीय पुरस्कार, ‘फोटो हंटर्स’ स्पर्धा  

Next

नाशिक : ‘फोटो हंटर्स असोसिएशन’कडून भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ‘फोटो हंटर्स’ स्पर्धेत पत्रकारिता गटात ‘लोकमत’ नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी एक सुवर्ण व रजतपदक प्राप्त केले.
फोटोग्राफिक सोसायटी आॅफ अमेरिका (पीएसए) आणि इंटरनॅशनल युनियन आॅफ फोटोग्राफर्स, चीन (आययूपी)च्या संयुक्त विद्यमाने कोलकाता येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण २२ देशांमधील २०० छायाचित्रकारांनी भाग घेतला होता. त्यापैकी भारतातून एकूण १०५ स्पर्धक होते, तर पत्रकारिता गटात एकूण ५८ स्पर्धकांचा सहभाग होता. त्यामध्ये २१ छायाचित्रे बक्षीसपात्र ठरली. या गटात पीएसएच्या सुवर्णपदकाचे खरोटे हे भारतातून एकमेव मानकरी ठरले, अशी माहिती असोसिएशनचे स्पर्धेचे अध्यक्ष अभिजित बॅनर्जी यांनी दिली.
गरीबी-श्रीमंतीमधील विरोधाभास खरोटे यांनी आपल्या छायाचित्रातून टिपला होता. या छायाचित्राने ‘पीएसए’चे सुवर्णपदक मिळविले.
तसेच जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात दुष्काळाची दाहकता दर्शविणारे दुसरे छायाचित्र रजत पदकास पात्र ठरले. ही दोन्ही छायाचित्रं ‘लोकमत’ने नाशिक आवृत्तीमध्ये प्रसिद्ध केली होती.

Web Title:  Prashant Khorro of 'Lokmat' won the International Film Festival of Photography, 'Photo Hunters' competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत