चारित्र्याच्या संशयावरुन नव-याने केली पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 04:49 PM2017-08-12T16:49:44+5:302017-08-12T16:50:17+5:30

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नव-याने तिची हत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी पहाटे ही थरारक घटना घडली.

The murder of a newly-married wife by the character of the character | चारित्र्याच्या संशयावरुन नव-याने केली पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरुन नव-याने केली पत्नीची हत्या

Next

नागपूर, दि. 12 -  पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारुड्या नव-याने तिची हत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी पहाटे ही थरारक घटना घडली. ममता एकनाथ कोहळे (वय २४) असे मृत महिलेचे नाव असून आरोपीचे नाव एकनाथ काशिनाथ कोहळे (वय २७) आहे.  डिप्टी सिग्नल, पुंजाराम वाडी झोपडपट्टीत त्याचे घर आहे. 
  
एकनाथ मोलमजुरी करतो. चार वर्षांपूर्वी त्याचा ममताशी विवाह झाला होता. त्याना दोन मुले आहेत. एकनाथला दारूचे व्यसन असून तो संशयी वृत्तीचा असल्यामुळे पत्नी ममताशी नेहमी वाद होत होता. अनेकदा वादाचे रुपांतर कडाक्याच्या भांडणात व्हायचे. रोजच्या कटकटीला कंटाळून काही दिवसांपूर्वी ममता दोन्ही मुलांसह माहेरी निघून गेली. त्यामुळे एकनाथने घरातील  वस्तू विकून दारूचे व्यसन भागविण्यास सुरूवात केली. 

मात्र, जेवणाचे भागत नसल्यामुळे शुक्रवारी एकनाथ  पत्नीला भेटायला सासरी गेला. त्याने ममताला सोबत चलण्यास सांगितले. तिने नकार दिल्यामुले त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी एकनाथने नमते घेण्याचा बनाव केला. यापुढे दारू पिणार नाही आणि तुझ्या चारित्र्यावर संशय घेणार नाही, असे आश्वासन तिला सासूसास-यांपुढे दिले. त्यामुळे ममताच्या आईवडीलांनी तिचे मन वळवून तिला एकनाथसोबत जाण्यास सांगितले. 

सायंकाळी पत्नीसह घरी आल्यानंतर तो बाहेर गेला आणि रात्री १० च्या सुमारास एकनाथ पुन्हा दारूच्या नशेत टून्न होऊन आला. सोबत दारूची बाटलीही होती. त्याने ममताच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ केली. त्यामुळे दोघात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी एकनाथने तिला मारहाण केली आणि रागाच्या भरात दोघेही जेवण न करताच झोपले. पहाटे  ४ च्या सुमारास एकनाथ उठला. घरात ठेवलेली दारू ढोसायला त्याने सुरूवात केली. ममताने त्याला विरोध केल्यामुळे त्याने घरात पडलेल्या लाकडी दांड्याने तिला बदडणे सुरू केले. रागाच्या भरात त्याने तिच्या डोक्यावर फटके मारले. 

त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यांनी रक्तबंबाळ अवस्थेत ममताला मेयोत दाखल केले. तेथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खेतारीन अंकालु महीलांगे (वय ५०) यांनी तक्रार नोंदवल्यानंतर कळमना पोलिसांनी एकनाथवर खुनाचा गुन्हा दाखल केला. तो फरार  असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
 

Web Title: The murder of a newly-married wife by the character of the character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.