कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ, शेतकºयांना महावितरणचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 07:10 PM2017-11-16T19:10:39+5:302017-11-16T19:10:58+5:30

राज्यातील कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकºयांना वीज बिल भरण्यास आज शासनाने १५ दिवासांची मुदतवाढ दिली. आता ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकºयांची वीज खंडित होणार नाही.

Mahavitaran's relief to farmers for 15 days to fill the exhausted electricity bill of agriculture | कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ, शेतकºयांना महावितरणचा दिलासा

कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ, शेतकºयांना महावितरणचा दिलासा

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १६ : राज्यातील कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकºयांना वीज बिल भरण्यास आज शासनाने १५ दिवासांची मुदतवाढ दिली. आता ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकºयांची वीज खंडित होणार नाही.
३० आॅक्टोबरलाच थकित वीजबिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ ची घोषणा केली होती. या घोषणेनुसार शेतकºयांना ७ नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता भरायचा होता. ही मुदत आता ३० नोव्हेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चालू वीजबिल ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकºयांना आता भरता येईल.
    ३० नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही शेतकºयाने वीज कनेक्शन खंडीत केले जाणार नाही. ३० हजार रूपयापर्यंत मूळ रक्कमेचे पाच हप्ते करण्यात आले असून मुद्दल  मूळ रक्कमेचे पाच हप्ते डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत शेतकºयांनी भरायचे आहे.
    ज्या शेतकºयांना अजूनपर्यंत वीजबिल वितरीत करण्यात आले नाही, त्या शेतकºयांना महावितरणने त्वरीत वीजबिलाची वाटप करण्याच्या सूचनाही आज दिल्या.  मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ चा लाभ शेतकºयांनी घेतला तर शेतकºयांचे दंड व्याज बाजूला ठेवण्यात येईल. अनधिकृत वीजजोडण्या विरुध्द नियमानुसार कारवाई करावी. सदर योजनेतील इतर अटी व शर्तीं मध्ये अन्य कोणताही बदल नाही

Web Title: Mahavitaran's relief to farmers for 15 days to fill the exhausted electricity bill of agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.