कासारवडवली हत्याकांड : शीतपेयात आढळले गुंगीचे औषध

By admin | Published: March 11, 2016 04:00 AM2016-03-11T04:00:22+5:302016-03-11T04:00:22+5:30

संतापाच्या भरात नव्हें तर पद्धतशीरपणे बेत आखूनच हसनैन वरेकरने आपल्या परिवारातील १४ जणांची हत्या केल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Kasaravadavali massacre: found in the cold drink | कासारवडवली हत्याकांड : शीतपेयात आढळले गुंगीचे औषध

कासारवडवली हत्याकांड : शीतपेयात आढळले गुंगीचे औषध

Next

मुंबई : संतापाच्या भरात नव्हें तर पद्धतशीरपणे बेत आखूनच हसनैन वरेकरने आपल्या परिवारातील १४ जणांची हत्या केल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. वायुमिश्रित पेयात गुंगीचे औषध आढळल्याचा निष्कर्ष न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांनी काढला आहे. हा निष्कर्ष सुबियाने दिलेल्या जबाबाला पुष्टी देणारा आहे.
कोला या शीतपेयात आम्हांला गुंगी आणणारे औषध आढळले. हे औषध अधिक मात्रेने मिसळण्यात आले होते. त्यामुळेच हत्याकांडात मरण पावलेल्या व्यक्ती बेशुद्ध झाल्या होत्या. शीतपेयात आढळलेले गुंगीचे औषध आणि सर्व मृतांच्या आतडीत आढळलेला रासायनिक पदार्थ एकच आहे, असेही कलिना न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या एका वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. न्यायवैद्यक प्रयोशाळेचा निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचा आहे. वरेकरने पूर्वनियोजन करूनच हत्याकांड केले, असे जे बोलले जाते, त्याला निष्कर्षाची मदत होऊ शकते.
वरेकर काही औषधी गोळ्या घेत असल्याची माहिती आहे. परंतु, तीनदा घराची झडती घेऊनही औषधांची चिठ्ठी मिळाली नाही. मानसिक आजारासाठी त्याच्यावर कोण उपचार करीत होते, मानसोपचारतज्ज्ञांना यासाठी आम्ही त्याचा फोटो दाखवून ही व्यक्ती तुमच्याकडे उपचार घेत होता का, अशी विचारणा करीत आहोत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Kasaravadavali massacre: found in the cold drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.