कदम यांची बंदद्वार चौकशी

By Admin | Published: August 18, 2016 12:56 AM2016-08-18T00:56:44+5:302016-08-18T00:56:44+5:30

बुलडाणा येथे आरोपी आमदार कदम यांच्या चौकशीसाठी सीआयडी कार्यालयात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

Kadam's Bandwagon Inquiry | कदम यांची बंदद्वार चौकशी

कदम यांची बंदद्वार चौकशी

googlenewsNext

हर्षनंदन वाघ
बुलडाणा, दि. १७ : बुलडाण्यासह राज्यातील विविध ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ कार्यालयातील घोटाळाप्रकरणी मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांची १७ ऑगस्ट रोजी येथील कारागृह रस्त्यावरील सीआयडी कार्यालयात दिवसभर बंदद्वार चौकशी करण्यात आली. दरम्यान, १८ ऑगस्ट रोजी पोलीस कोठडीची मुदत संपणार असल्याने न्यायालयात हजर केल्यानंतर तपास करणारे सीआयडी पथक आरोपी रमेश कदम यांची अधिक चौकशीसाठी पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट २0१२ ते डिसेंबर २0१४ या काळात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना आरोपी आमदार रमेश कदम यांनी महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या निधीचा घोटाळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी पुणे येथील सीआयडी पथकाने आमदार कदम यांना सोबत घेतले आहे. दरम्यान, १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीची मुदत संपत असल्यामुळे १७ ऑगस्ट रोजी सीआयडी पथकाने दिवसभर बंदद्वार चौकशी केली. या प्रकरणी तपासादरम्यान पथक आरोपी कदम यांना व्हीआयपी सुविधा पुरवित असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित होताच सर्वत्र खळबळ उडाली. या वृत्तानंतर आरोपी कदम यांना व्हीआयपी सुविधा पुरविण्यात आली नाही. सकाळी शहर पोलीस स्टेशनच्या कोठडीतून थेट सीआयडी कार्यालयात चौकशीसाठी कदम यांना नेण्यात आले. या ठिकाणी दिवसभर बंदद्वार चौकशी सुरू होती.

मोठे मासे गळाला लागणार?
आरोपी आमदार रमेश कदमकडून येथील कार्यालयाकडून कोण-कोणत्या लाभार्थींना धनादेश देण्यात आले, लाभार्थींनी धनादेश कसे वटविले आदींबाबत तांत्रिक माहिती सीआयडी पथकाने घेतल्याचे समजते. या चौकशीनंतर बुलडाण्यातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

'लोकमत'च्या वृत्ताने खळबळ; 'व्हीआयपी' सुविधा बंद!
आरोपी आमदार रमेश कदमला बुलडाण्यात व्हीआयपी सुविधा पुरवित असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने १७ ऑगस्ट रोजी प्रकाशित केले होते. या वृत्तामुळे सर्वत्र खळबळ उडाली. यानंतर १८ ऑगस्टला कदमला कुठलीही व्हीआयपी सुविधा पुरविण्यात आली नाही.

Web Title: Kadam's Bandwagon Inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.